पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ६७. ३६१ प्राप्त होत असून त्याच्या यथार्थ ज्ञानाने त्याचा क्षय होतो. आतिवाहिक देहादिकांच्या द्वारा अध्यारोप व अपवाद याची कल्पना करणे हे सुद्धा आत्म्याच्या व्युत्पत्ती करितांच होय. परमार्थदृष्टया तिचा काही उपयोग नाही. कारण प्रमाता, प्रमाण व प्रमेय ही त्रिपुटी व तद्रूप जग ब्रह्मच आहे, असे साक्षात् जाणल्यावर आतिवाहिकादिकाचे वर्णन करण्यास अवकाशच रहात नाही. परब्रह्माहून मी भिन्न आहे, असे मानल्याने अथवा तशा सस्कारामुळे हा दुसरा आतिवाहिक भाव प्राप्त होतो. पण ' मी ब्रह्म आहे ' असे जाणल्याने ब्रह्मच होणे योग्य आहे व ते (ब्रह्मत्व-)ज्ञान भ्रमजन्यही नाही, तर सत्य आहे. श्रीराम--पण गुरुराज, चिदेकरस ब्रह्माचे ठायीं अज्ञानाचाच असं- भव आहे. तेव्हां त्याच्या अभावी जीवभेद-कल्पना कशी होणार ! तसेच ब्रह्म व आत्मा यांचे स्वभावतःच ऐक्य आहे. तेव्हां मोक्षफल देणाऱ्या विचाराची तरी प्रवृत्ति कशी होणार ? __ श्रीवासिष्ठ-राघवा, हा प्रश्न तू तत्त्व जाणून करीत आहेस की, त्यास न जाणता ? तत्त्वाचा साक्षात्कार केल्यावर जर तू हा प्रश्न करीत असशील तर तुझे झणणे अगदी बरोबर आहे. कारण तत्त्वज्ञा- नानतर विचार निरुपयोगी आहे. पण त्यास न जाणतां जर तू हा प्रश्न करीत असलास तर असा प्रश्न करावयाचा काल अजून आला नाही, एवढेच मी तुला. सुचवितो. कारण हा प्रश्न सिद्धात-कालींच शोभतो. अकाली केलेले कोणतेही कार्य निरर्थक ठरते. श्रावणात कुदावर फुलें जरी आली तरी ती उत्पातसूचक असतात. अकाली केलेले उत्तम भाषण- ही मूर्खाच्या वल्गनेप्रमाणे उपहास्य होते. सर्व पदार्थ थापापल्या योग्य काली योग्य फल देत असतात. असो, आता अगोदर मी तुला प्रस्तुत तत्त्वच अधिक स्पष्ट करून सागतो. अशा रीतीने तो स्वप्नसमष्टयात्मा योग्य काल आला अमता समष्टिरूपाने उत्पन्न होतो. प्रणवाचा उच्चार व त्याच्या अर्थाचे ज्ञान याच्या योगानें तो जें मनोराज्य करितो तें तें तात्काल तसेंच झाले आहे, असे पहातो. झणजे हे सर्व आकाशादि जग सम- ष्टीच्या मनोराज्यापासून झाले आहे. त्यामुळे व्यष्टि मनोराज्याप्रमाणे तेंही असत् आहे. आकाशांत दिसणान्या नीलवर्णाप्रमाणे हे जग भ्रामक आहे. फार काय पण मेरु पर्वताची अनुभवास येणारी उंचीही भाकाश-