पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६. बृहद्योगवासिष्टसार. सांगा. झणजे तन्मात्रे, इद्रियें, समष्टि व व्यष्टि-स्थूल शरीर यांच्या उत्प- तीचा क्रम ऐकण्याची माझी फार इच्छा आहे व ती पूर्ण करण्यास भापणच समर्थ थाहां. श्रीवसिष्ठ-राघवा, जीवस्वरूप अत्यत असंभवनीय आहे. ते आपल्या शुद्ध कारणाहून भिन्न नाही. पण भितऱ्या मुलाच्या हृदयांत लट्ठ राक्षसाचा किंवा भूताचा भाकार जसा उत्पन्न होतो त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये ही जीवता उत्पन्न होते. ती वस्तुतः शुद्ध, मानमेयात्मक (प्रमाण- प्रमेयरूप ) व सत्य असूनही असत्याप्रमाणे स्थित असणारी व भिन्न नसतांना भिन्न असल्यासारखी आहे. ती ब्रह्माच्या वृद्धिरूप आहे. (जीवतेमुळेच ब्रह्माला ब्रह्मत्व आले आहे तिच्या अभावीं ते ब्रह्मही नव्हे.) ज्याचा अनुभव आला असेल त्याचेच मनन करिता येते. पण अनुभव, मन व मेय मणजे इंद्रिये व विषय यांवाचून येत माही. यास्तव मान-मेय-वासनेचा उद्भव होणे हेच ब्रह्माच्या मनोभावाचे निमित्त आहे. “ जीववासनेमुळे ब्रह्म जसें जीव होते त्याचप्रमाणे मनन पासना उत्पन झाल्यामुळे तो जीवच अथवा जीवभावापन्न ( जीव-भावास प्राप्त झालेलें ) ब्रह्मच मन होते. ते मन तन्मात्राविषयीं मनन करून लागलेच स्वतः तद्रूप झाले आहे, असे पहातें. तो अतिसूक्ष्म तन्मात्रात्मा, चिदाकाश प्रकाशमान होऊ लागले असता, त्याच्या स्फूर्तीने स्वतः स्फू- तिमान् (ज्ञानात्मक ) होऊन सृष्टिकाल आल्याकारणाने पंचीकरणाच्या द्वारा सकल्पानेच उत्पन्न केलेले रमणीय ब्रह्माडरूप व मनुष्यादि देहांचे रूप आपल्यामध्येच पहातो. त्यात प्रथम शब्द व अर्थ याच्या विभागाची स्फूर्ति होत नाही. (ह्मणजे मी तत्त्वरूप आहे की, मनुष्यादि आकाररूप आहे, हे त्यास कळत नाही) त्यामुळे ते रूप जड असल्यासारखे असते. पण पुढे ते " अहं " ह्मणजे मी असा देहावर अध्यास करिते; त्यानंतर प्यास संसारतत्त्वाचे स्मरण होते. देहाभिमानामुळे तो देहमय होतो. पुढे भापल्याच अणजे शरीराच्याच मुखादि भागामध्ये क्रमाने रसना, चक्षु, प्राण, इत्यादिकांची कल्पना करून सर्व इंद्रियांनी संपन्न होतो. याप्रमाणे तो जीववासनेप्रमाणे विशिष्ट देहयुक्त होतो व बाह्य विषयादिकांस पहातो. सारांश, राघवा, याप्रमाणे समष्टि ब व्यष्टि जीवाचा संकल्पमय भातिवाहिक देह उत्पन होतो. ब्रह्माच्या अज्ञानामुळे हा विविध देहभाव