पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५७ ३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ६७. मातेच्या व मुलाच्या शरीरांतील चैतन्य निरनिराळे आहे, असे जे वाटते ते त्याच्या शरीरामुळे होय. शरीरादिकावांचून चैतन्यांतील भेद जाणता येणे शक्य नाही अर्थात् चैतन्याचा भेद हा औपाधिक भेद आहे. वास्तविक नव्हे हे कोणालाही थोड्याशाच विचाराने समजण्यासारखें आहे. प्रतिशरीरातील जीवाचा भेदही याच न्यायाने असत्य औरतो. उपाधिभूत शरीरेही आपापल्या कारणाहून वस्तुत भिन्न नसल्यामुळे पच-, भूतमय आहेत, असे ह्मणावे लागते व भूताचे आद्यविवर्त कारण चित् आहे. त्यामुळे हे सर्व चिन्मय आहे, असा विवेकबुद्धीने निश्चय करावा. पण याप्र- माणे भेद असत् आहे, असे जरी ठरत असले तरी मनोभ्रम असेपर्यंत त्याचा अनुभव आल्यावाचून रहात नाही. अर्थात् अमुक जन्मास आला, अमुक मेला इत्यादि प्रतीति हा मनोविलास आहे. त्याचा अनुभवच येऊ नये असे वाटत असल्यास तू भनुभवाचे निमित्त (मन ) नाहीसे कर. मन भगोदर "मी व माझे" असे पहाते व तेंच भेदकल्पनेचे मूळ आहे. आत्मस्वरूपाचे अज्ञान व भोगाच्या विविध माशांचे सस्कार, हे " मी व माझें" या कल्पनेचे मूळ आहे. तात्पर्य मथुरेच्या लवण राजास स्वप्नात जसा " मी चाडाळ आहे " असा भ्रम झाला होता त्याप्रमाणेच चित्तास या जगस्थि- तीचा भ्रम होतो. राघवा, हे सर्व मनोमात्र आहे. यास्तव वर सांगितलेलाच भारोपक्रम ध्यानात रहावा ह्मणून मी तो पुनः सांगतो. अगदी सौम्य सागरात जसा अति अल्प जलस्पंद उठावा त्याप्रमाणे शात ब्रह्मरूप चित विषयो- न्मख होते तीच विषग्नविचारोन्मुख चित् चित्तरूपी ऊर्मि धारण करीत होत्साती स्पंद बावल्यामुळे जीवरूपास प्राप्त होते. नतर ब्रह्मसागरात चित्-जल, जगत्-रूपी बुडबुडे निर्माण करिते. यास्तव हे प्रिय रामा, जीव हा मायाविलासामुळे, ब्रह्माच्या आधारानेच होणारा, ब्रह्माच्या स्वरूपभत चैतन्याचा आभास आहे, हे कधीही विसरू नको. चिदाभासरूप ब्रह्मास जीव अणतात. निश्चयरूप उपाधीमुळे त्यासचोबुद्धि हे नांव देतात. स्मरण या कार्यामळे यास चित्त समजतात. अभिमानामुळे तें अहंकार होते. विशेएशक्तीच्या योगाने ते मायास्वरूपी बनते, श्वासोच्छ्रासाच्या योगाने ते प्राण होते. पाहूं लागते तेव्हा ते नेत्र होने ५ येणेप्रमाणे सर्व तेच आहे. पण निरनिराळ्या उपाधींमुळे त्यास निरनिराळी नांवें प्राप्त झाली अहित. मी तुला मार्ग सांगितलेच आहे की, संकल्पप्रधान समष्टि-मन