पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५६ बृहद्योगवासिष्ठसार अभावी ते शात रहाते. स्वाभाविक चित्त्व हेच चित्त होय. त्याची आत्म्याच्या अज्ञानाने विषयाकार कल्पना केल्यास ते तदाकार होते. ह्या त्याच्या विषयाकारासच स्पंद ह्मणतात. पण तेच जेव्हां विषयाकाररहित होते तेव्हां त्यास अस्पंद मणतात. एवं च स्पंद व अस्पंद यांच्या योगानेच चैतनास प्रपचरूपता व अप्रपंचरूपता प्राप्त होते. अर्थात् स्पंदालाच जीव, कारण, कर्म, दैव, इत्यादि ह्मणतात. ह्मणजे प्राणस्पंदास जीव, आपल्यातील कार्यास व्यक्त करणाऱ्या स्पंदास कारण, शरीर, इद्रिये, इत्यादिकाच्या स्पदास कर्म व सूक्ष्मावस्थेत चिरकाल राहून फलोन्मुख झालेल्या स्पदास दैव ह्मणतात. पण अनुभवसत्तेचा अवलव केल्यावाचून त्या जीवादिकास आपापले कार्य करितां येत नाही. यास्तव जो हा अनु- भवात्मक चित्स्पद आहे तोच जीव, कारण, कर्म, दैव, इत्यादि होय व तेच संसाराचे बीज आहे. रामा, आता ' तो त्याच्याठायीं उत्पन्न कसा साला?' असा जो तू वर ( सर्गाच्या आरभी) प्रश्न केला आहेस त्याचे उत्तर सांगतो. हा अनुभवात्मक चित्स्पद पूर्वमरणसमयीं कृतकर्माप्रमाणे बुद्धीमध्ये जसा सकल्प कारतो त्याप्रमाणे पुढच्या जन्मी तो होतो. भनेक अनुभवात्मक चित्रपदातील (चिदाभासातील ) जे काही चित्स्पद मंद शास्त्रीय प्रवृत्ति करणारे असतात ते सहस्रावधि योनीत जातात व दीर्घकालाने या ससारातून सुटतात. पण जे तीव्र शास्त्रीय प्रवृत्ति कर- णारे व त्यामुळेच ज्ञानाचे अधिकारी असतात ते एकाच जन्माने मुक्त होतात. साराश परमात्म्यानेच ससारात जीवरूपाने उत्पन्न होणे हे चित्ताच्या अधीन आहे व त्यामुळेच त्याचा जन्म वास्तविक नव्हे. उ- पराधीप्रमाणे होणे हा केवल चैतन्याचाच नव्हे तर सर्व प्रकाशांचा स्वभाव आहे. सूर्याचा किवा दिव्याचा प्रकाश पाढन्या वस्त्रावर पाढरा होतो; ताबड्या शालीवर लाल होतो; पिवळ्या पिताबरावर पिवळा होतो; काळ्या; पर काळा होतो हे सर्वास ठाऊक आहेच. या स्वभावामुळेच चैतन्य दहाच्या उत्पत्तीस कारण होणाऱ्या अन्नरसानें परिणत होते. नतर पिता माता याच्या शरीरातील शुक्रशोणितरूपाने परिणाम पावतें व.बाचा गर्भाशयांत ससर्ग झाला ह्मणजे हळु हळु देहरूप होते. तो देहच शाक्षिय केवा अशास्त्रिय कर्मानुष्ठानाच्या द्वारा स्वर्ग, मोक्ष, नरक, वध, त्यादिकास कारण होतो. हा सर्व चैतन्याचाच विकार आहे. पित्याच्या