पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५१ बृहद्योगवासिष्टसार केल्यावाचून इद्रियनिग्रह करितां येत नाही, असा सामान्य नियम आहे. पास्तव, राघवा, तुला ज्या ज्या विषयाचा अभिलाष असेल त्याला त्याचा मनापासून त्याग करून जर तूं स्वरूपांत स्थिर झालास तर तुला मोक्ष मिळालाच प्रणून समज. यांत दुष्कर तें काय आहे ? भरे बा क्षत्रिया, तुह्मी महावीर आपल्या अमूल्य प्राणानाही तृणाप्रमाणे तुच्छ समजून त्याचा त्याग करितां की नाही ? मग इष्ट विषयांविषयींचा अति तुच्छ भिलाष सोडण्याचीच तुह्माला इतकी भीति कां वाटावी ? तस्मात् वा साधो, ज्याच्याविषयी अभिलाष असेल त्या विषयातील आसक्ति सर्वथैव सोडून, यदृच्छेनें जें प्राप्त होईल त्याचा कमेंद्रियांनी स्वीकार कर व त्यावर निर्वाह करून नष्ट झालेल्या वस्तूविषयी शोक न करितां शांत चित्ताने रहा. अशा त-हेचा जो तत्त्ववेत्ता असतो त्याचे अजत्व झणजे जन्मादि विक्रिया- शून्य ब्रह्मत्व तळहातावरील आवळ्याप्रमाणे अथवा पुढच्या पर्वताप्रमाणे अगदी प्रत्यक्ष आहे. या सर्व विवेचनाचा साराश असा-ज्याप्रमाणे कल्पांत- समयीं एकरूप झालेला समुद्र तरगाच्या योगानें भेदयुक्त दिसतो त्याप्रमाणे आ- माच जगत्-रूपाने आविर्भूत झाला आहे, असे भासते. पण तो ज्ञानाच्या योगाने अभिव्यक्त झाला असता मोक्षनामक पुरुषार्थ देतो व अज्ञानानें आवृत झाला असता प्रथम सर्व अनर्थाचें आदिकरण जे मन त्याच्या अवस्थेस झणजे मनस्त्वास व नतर मनःप्रयुक्त दीर्घबधनाम कारण होतो ६६. सर्ग ६७-भोका जो जीव त्याचे व्यष्टिप्राधान्यतः स्वरूप व इंद्रियादिकांचा संभव या सर्गात सागतात. श्रीराम-गुरुराज, मनास सकल्पाने उत्पन्न करून समष्टि जीव भापल्या ठायीं त्याचा तादात्म्य-अध्यास करितो व मनस्त्वयोग्य जीव होतो, पण याचा व परमात्म्याचा काय संबंध आहे ? तो त्याचा अश आहे की, कार्य आहे ? की स्वतः तो परमात्माच आहे. जर तोच असेल तर त्याच्या ठायीं उत्पन्न कसा झाला ? ह्मणजे परिणाम पावून उत्पन्न झाला की विवर्तरूपानें ? जीव परमात्म्याचा परिणाम आहे ह्मणून ह्मपाल तन दुधाचा दही हा परिणाम झाला असतां, दूध नष्ट होत असल्याचे अनुभवास येत असल्यामुळे परमात्मा अनित्य आहे, असे होणार व जीव परमात्म्याचे ठायी रज्जूसाप्रमाणे विवर्तरूपाने उत्पन्न झाला आहे असे हणाल तर