पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ६६. युक्त) नसते. तर ते अविद्येच्या योगाने विक्षिप्त झाले की त्या विक्षिप्तत्वामुळे तें सविषय होते, असा नियम आहे. त्यामुळे ज्ञान-समाधीच्या दार्भाच्या योगाने चिद्धनैक्य अभिव्यक्त झाले अणजे अविद्याविक्षेप नाहीसा होतो व त्याच्या भभावी चैतन्याचे औपाधिक सविषयत्वही पार नाहींसें होतें. ईश्वरादिकाची सर्वज्ञताही मायिक आहे. तो चैतन्याचा स्वाभाविक धर्म नव्हे. हा अमुक विषय. मी पहात आहे; मी जिवत आहे; मी ससार करीत आहे इत्यादि कल्प- नाही चित्त-निमित्तक आहेत. (ह्मणजे चित्त हेच त्याचे निमित्त आहे.) चित्ताचा क्षय झाला असता त्याचा क्षय होणे अगदी उचित आहे. आतां तूं कदाचित् ह्मणशील की, चेतन झणजे चिचाचा व्यापार. ज्ञान व समाधि याच्या अभ्यासाने त्याचा निरोध होतो; हे खरे, पण व्यापाराचा निरोध होताच चित्ताचाही निरोध झालाच पाहिजे, असे काही ह्मणतां येत नाही. कारण शरीराच्या व्यापाराचा निरोध केल्यावरही शरीर अनि. रुद्ध असू शकते. पण त्याचे समाधान असें-वायू हुन स्पंद जसा निराळा नाही त्याप्रमाणे चित्ताहून चित्ताचा व्यापार स्वभावतः भिन्न नाही. त्यामुळे चित्तव्यापार निरुद्ध झाला की, चित्तही निरुद्ध झालेच, असे समजावें. शरीराचा व्यापार बद केल्यावर त्या-(शरीरा- चा निरोध होण्याचे आणखी काय रहाते, तेच मला समजत नाही. अग्नी- तील उष्णता गेल्यावर अग्नीचे काय रहाते कोण जाणे ! असो; याप्रमाणे चित्तक्षव झाला असता चैतन्यात विषयाची प्रथा होत नाही व ज्याचे प्रथाच होत नाही त्याची सिद्धि होणे अशक्य आहे. तस्मात् चित्तक्षयाने विषयानुभवाचा क्षय होतो. तर मग पूर्वी ह्मणजे चित्त होते तेव्हा त्याचा अनु- भव कसा येत होता? ह्मणून विचारशील तर सागतो. रज्जु-सर्पभ्रमाप्रमाणे तो अविद्याभ्रम आहे, असे तत्वज्ञ जाणतात. एवं च रज्जसर्पस्पंदाप्रमाणे, चित्तस्पदात्मक अशा या ससाराचीही चिकित्सा केवळ बोधानेच करितां येणें शक्य आहे व ती करिताना कोणत्याही प्रकारचा आयसही नाही. सर्वस्वा- चा परित्याग करून जर तू वासनामय-चित्तशून्य होऊन राहिलास तर तात्काल मुक्तच होशील, यात सशय नाही. रज्जूस पहातांच सर्पभ्रम जसा तात्काल नाहीसा होतो त्याप्रमाणे सर्व ज्ञानशक्तीस अंतर्मुख करून स्वत- त्त्वाचे दर्शन घेतले असता तान्काल ससार नाहीसा होतो. पण इद्रियनिग्र- हावाचून जातशाक्त अतर्मुख होत नाही व विषयाभिलाषाचा त्याग