पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५२ बृहद्योगवासिष्ठसार. चित्तावांचून व चित्ताच्या बाहेर कधीही येत नाही. तर तो नित्ताच्याच योगाने व चित्तांतच येत असतो. यास्तव जग चित्तमात्र आहे व त्यामु- केच चित्ताचा क्षय झाला असतां जगाचा क्षय होतो. केळीच्या झाडाचे स्वरूप पानांहून भिन्न नाही. तिचा स्तंभही एकावर एक गुंडाळलेल्या सोपटांचाच झालेला असतो. त्याचप्रमाणे जगम चित्त-तं आहे. चित्तच भ्रमाने उत्पन्न होते; बाल्यावस्थेस प्राप्त होते; क्रमाने यौवन व वार्धक्य यांचा अनुभव घेते; मरणाचा सोहाळा पहाते व स्वर्गात अथवा भरकात जाते. तालर्य हा सर्व नाच तेच करिते. मदिरेमध्ये खोटेच अनेक भ्रम दाखविण्याचे जसे सामर्थ्य असते तसे या चित्तात जग भासविण्याचे सामर्थ्य आहे. नेत्रांस रोग झाला असतां असे दोन चद्र दिसतात त्या प्रमाणे चित्ताची भ्रांतिजननशक्ति जीवचैतन्यास परतत्र करून जग दाखविते. मणजे चित्तशक्तीने युक्त असलेला जीव जग पहातो. घरी आलेल्या पुरुषास सभोवारचे वृक्ष फिरत आहेत, असा भ्रम होतो. त्या प्रमाणेच जीव चित्ताच्या योगानें क्षुब्ध झालेल्या ससारास पहातो. जेव्हा चित्त- युक्त जीवास द्वित्वाचा म्हणजे आपल्याहून निराळ्या द्वैतमय जगाचा अनुभव येतो तेव्हा द्वैत व ऐक्य याचा भ्रम होतो. पण जेव्हा चित्तरहित झालेल्या त्यास द्वित्वाचा अनुभवच येत नाही तेव्हा द्वैत व ऐक्य याचाही क्षय होतो. ज्याचा अनुभव येतो ते चित्-हून भिन्न, मणजे जडच, असले पाहिजे. पण जड व परतत्र वस्तूला स्वतः सत्ता नसते. ते अनुभवसमयींही चैतन्याच्या सत्तेनेच सत्तायुक्त होत असते. ह्मणून आह्मीं त्याला चित्- हुन भिन्न नसणारे ह्मणून झणतो. याप्रमाणे विषेक करून विषयांचा वस्तुतः अभाव आहे, असा दृढ निश्चय झाला असता इंधनरहित अग्नी- प्रमाणे चित्त आपोआप शात होते. (इधन ह्मणजे काष्ठादि दाह्य पदार्थ. ते नसले की, अग्नि आपोआप शात होऊ लागतो. त्याप्रमाणेच बाह्य व आंतर विषय अमत् आहेत, असे कळून आले की, त्याच्या विषयींचे संकल्पादि क्षीण होऊन शेवटी स्वतः चित्तही क्षीण होते, असा याचा भावार्थ. ) असो; आता जीवन्मुक्त केव्हा होतो ते सागतो. चैतन्यधन परमात्म्याशी ऐक्य पावून जेव्हां पुरुष निश्चल होऊन रहातो तेव्हां तो समाधिस्थ असला तरी किंवा भिक्षाटनादि शरीरनिर्वाहोपयोगी अवश्य करें करीत असला तरी, संशातच असतो. कारण केवल चैतन्य सविषय (विषय