पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकर-सर्ग ६६. ३५१ आहे. वस्तुतः मन हेच सर्व अनर्थीचे कारण आहे. पण अनात्मपदार्था- मध्येच अत्यंत आसक्त झाल्याकारणाने जीवास ते कळत नाही. ह्मणजे आपल्या मनानेच वेताळाची अगोदर कल्पना करून भयभीत झालेल्या एकाद्या मूर्खाला हा वेताळ मीच मनाने कल्पिला आहे हे जसे कळत नाही त्याचप्रमाणे हा प्रकार होतो. साराश सर्व व्यापी चित्-तत्त्वानें- विषयोन्मुख होणे-हा स्वभाव धारण करणे, हेच अनर्थ-परपरेचे मूळ आहे. तेंच चित्त होय. चित्तामुळेच जीवत्वाची कल्पना होते. जीवत्वाच्या योगाने अहंभाव, अहमीवामुळे चित्तत्व, चित्तत्वामुळे इद्रियादित्व, इद्रियादिकाच्या योगाने देहच मी आहे असा भ्रम आणि देहादि भ्रमामुळे स्वर्ग, नरक, बंध, व मोक्ष. पण ही सर्व अनर्थपरपरा जीव व ब्रह्म याचा भेद आहे. अशाप्रकारच्या भ्रमामुळे होते. तो भ्रमच तिचे मूळ आहे. यास्तव ब्रह्म व जीव याचा जसा भेद नाही त्याचप्रमाणे जीव व चित्त याचाही भेद नाहीं माणि जीव-चित्ताच्या अभेदाप्रमाणेच देह व कर्म याचाही भेद नाही; असा निश्चय करावा. कारण त्याच्या ऐक्यज्ञानाने त्याच्याविषयींचा भ्रम बाधित झाला असता जगाचाही बाध होतो. सर्व शास्त्राचे रहस्य एकाच वाक्यात सागावयाचे असल्यास ते असे सागावे-कर्मच देह आहे. देहच चित्त आहे. न्यासच " मी " असे ह्मणून चित्त जीव होते. पण तो जीव ईश्वराचें चैतन्यच. आहे व तोच सदा शिव आत्मा होय १९.। सर्ग ६६-या सर्गात द्वैत मनोमात्र आहे व इष्टत्याग आणि प्रबोध याच्या योगाने मनाचा क्षय होतो, असे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, वर वर्णन केल्याप्रमाणे एक पर वस्तुच नानात्वास प्राप्त होते. ह्मणजे एका दिव्यापासून जसे उपाधिभेदामुळे अनेक दिवे प्रवृत्त होतात त्याप्रमाणे हा प्रकार होतो. चित्ताच्या अधीन असलेल्या जीवत्वाच्या कल्पनेने जसा बध उत्पन्न होतो त्याचप्रमाणे चित्ताधीन असणान्या विचार व तत्त्वबोध याच्या योगाने मुक्ति मिळते. यास्तव परुषाने नामरूपशून्य आत्म्याचे जर दर्शन घेतले तर त्यास शोक करण्याचा प्रसगच येत नाही. कारण हा नर चित्तमात्र आहे त्यामुळे विचाराने चित्त शात झाले की, सर्व द्वैताचाहि उपशम होतो. कारण चालणाराने आपले तळपाय चर्माच्या जोड्यानी झांकून घेतले की, ग्याला सर्व पृथ्वी चर्माच्छादित आहे, असे. भासते. जगाचा अनुभव