पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५० बृहद्योगवासिष्ठसार. कारणाने असत अशाही त्याचे भान होते त्याप्रमाणे हे मन या सर्गाचा अनुभव घेते. अर्थात् या द्वैताचा भास मनाच्या अधीन आहे. त्यामुळे मनाचा क्षय झाला असतां मनःकल्पित भेदही नाहीसा होतो व भेद नाहीसा झाला की, केवल शुद्ध व सत् आत्मतत्त्व अवशिष्ट रहाते. पण चित् व जगत् या दोघाचाही क्षय झाल्यावर सत् कोठून रहाणार ? ह्मणूत विचा- रशील तर सागतो. जग नित्य व अनित्य अशा विविध अंशानी युक्त आहे. त्यातील स्थिर नित्य अश मनाच्या उत्पत्तीपूर्वीही असतो. अस्थिर अंश मात्र त्याच्या चलनानतर अनुभवास येतो. यास्तव मनाचे स्फुरण नष्ट झाले की, त्याच्या कार्याचे झणजे जगातील असत्य अशाचे भान न होणे हे साहजिकच आहे. पण त्यामुळे सत्याशाचाही बाध होतो, असे ह्मणता येत नाही. स्वप्नात पाहिलेला पदार्थ मनोमात्र असल्याकारणाने मन दुसऱ्या अवस्थेत गेले की, तो बाधित होतो. पण त्यामुळे त्यास पहाणारा द्रष्टा कधी बाधित होत नाही. तस्मात् मनोनाशाने जगाच्या अस्थिर अशाचा बाध झाला असता स्थिराश अवशिष्ट रहाणे अगदी योग्य आहे. जगाचा अस्थिर अथवा असत्य अश ह्मणून ज्याला आम्ही म्हणतो तो वस्तुतः मनुष्याच्या शिगाप्रमाणे अत्यत असत् नसून केवल अनिर्वचनीय आहे. झणजे तो सत् आहे की असत् आहे याचा निर्णय करिता येत नाही. पण तो बाधित होत असतो. बाधित होणे ह्मणजे जागे झाल्यावर स्वप्न जसे खोटे आहे, असें निश्चयपूर्वक समजते त्याप्रमाणे अधिष्ठानाचे ज्ञान झाले असता आरोपित खोटे आहे, असा निश्चय होणे, अथवा निमित्ताचा अभाव झाला असता त्या नैमित्तिकाचा अनुभव न येणे. आता तू ह्मण- शील की, जग जर मिथ्या आहे तर असख्य प्राण्यास त्याचा एकसारखाच भास कसा होतो ? तर त्याचे उत्तर एवढेच की गारुड्याने उत्पन्न केलेल्या आब्याच्या मिथ्या झाडाचा पहाणाऱ्या सर्वास एकसारखाच जसा भास होतो तसाच या असत् झणजे अनिर्वचनीय जगास पहाणाऱ्या अनेकांस ते एकाच आकाराचे दिसते, असे जर आहे तर हा प्रपच दीर्घकाल एकसारखाच कसा भासतो ह्मणून विचारशील तर त्याचे उत्तर मागे दिलेच आहे. ते कोणते ह्मणून ह्मणशील तर सांगतो. चागल्या रीतीने न पाहिल्याकारणाने पुढचा खाब जसा चोर आहे, असा भास व्हावा त्याप्रमाणे मनाच्या आसक्तीमुळे ससाराख्य दीर्घ स्वप्न अस्तित्वात आले