Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पतिप्रकरणं-सर्ग ६५. ३४९ बांधलेल्या दोघांनी फेंसाच्या गोळ्यास जसें बांधितात त्याप्रमाणे ते चित्त कर्माच्या योगाने बद्ध होते. फैसाला बांधता येते पण त्याचे कारण जे जल त्याला बांधता येत नाही. त्याचप्रमाणे कमें चित्तास बद्ध करितात. पण चित्ताच्या कारणभूत चितीस बद्ध करू शकत नाहीत. सकल्प सर्व विकारांचे बीज आहे. व्यवहारांतही-सर्व कामे किंवा घट, चित्र, गृह, वस्त्र इत्यादि वस्तू सकल्पवक होत असतात. ह्मणजे सकल्प पूर्वी व त्याचे कार्य नतर-असाच क्रम आढळतो. जीव सकल्परूप आहे व तो कर्मशून्य आत्म्याच्या सानिध्यामुळे उत्पन्न होऊन कमें करितो. पण ही कमें जरी मागून होत असली तरी ती सर्वथैव. नूतन असतात, असे नाही. तर बीजात असणाऱ्या अकुराप्रमाणे पूर्वीच जीवामध्ये वासनारूपाने असणारी ती मागून केवळ व्यक्त होतात. बीजात अकुर, काड, शाखा, पणे, पुष्पें व फळे सूक्ष्मरूपाने पूर्वी असतात व तीच कालातराने योग्य स्थिति मिळाली असता व्यक्त होतात, हे प्रसिद्ध आहे. बीजस्थ जीवाचा जसा हा विलक्षण विस्तार होतो व तो नानात्वास प्राप्त होतो त्याप्रमाणे हिरण्यगर्भ जीवही विलक्षण विस्तारास व नानात्वास प्राप्त होतो. व्यष्टि जीवही याच रीतीने आपल्यामध्ये वासनारूपाने स्थित असलेल्या देहादि आकारांस प्राप्त झाले आहेत. पण त्यात विशेष इतकाच आहे की, हिरण्यगर्भ-जीवसकल्पापासून पूर्वीच उत्पन्न झालेल्या जगातील माता व पिता याच्या द्वारा ते देहयुक्त होतात. नतर जन्ममरणास कारण होणाऱ्या कर्माच्या योगाने ते उच्च नीच योनीत जातात. कर्म झणजे चित्स्पद. सारांश, वृक्षाच्या शाखा, पाने, पुष्पे. फळे इत्यादि एकदा होऊन पुन पुनः जशी ती होतात त्याप्रमाणे आद्य कारण ब्रह्मापासून चित्स्पदलक्षण शुभाशुभ कर्माच्या योगाने भोक्त्याचे देह भोग्य वस्तु व भुवनें वारवार होतात व वृक्षाच्या फलापासून जसे तसलेच दुसरे वृक्ष होतात त्याप्रमाणे एका कल्पातील प्राणिवासनारूप फळापासून दुसरी ब्रह्मा. उद्भवतात ६४. सर्ग १५-आता या सर्गात मन, भोग्यवर्ग, भोका व अनर्थाच मूल-याचे तत्त्व चिन्मात्रच आहे, असे विचारपूर्वक सिद्ध करितात. श्रीवसिष्ठ-परम कारणापासूनच मन प्रथम उत्पन्न झाले. ते मनन- रूप आहे व ते त्या कारणाच्या आधारानेच रहाते. पूर्वी कधी अनुभ- विलेल्या सुगंधाचे स्मरण झालें असतां ज्याप्रमाणे मनोरथरूप असल्या-