पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

___३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ६४. ३४७ जीवभाव आहे. याविषयी श्रीवसिष्ठ दृष्टांत देतात-) राघवा, वायु जेव्हा मुळीच वहात नसतो त्यावेळी समुद्राचे किवा दीपज्योतीचे जसे थोडेसें स्फुरण होत असते त्याप्रमाणे ब्रह्माचे किंचित स्फुरण हाच जीव होय. स्वभावतःच अति स्वच्छ असलेल्या ब्रह्माचे ठायी प्राणाधीन चल- नाचा अध्यास झाला असता व त्यामुळे त्याच्या शांतत्वाचा (म. निष्क्रि- यत्वाचा) भंग झाला असता व्यक्त होणारे जे त्याचे अल्प सवेदन (ज्ञान) तोच जीव होय. ह्मणजेच वायूच्या चलनाप्रमाणे, अग्नीच्या उष्णतेप्रमाणे, व तुषाराच्या शीततेप्रमाणे आत्म्याचे हे जीवत्व आहे. अर्थात् मोक्षापर्यंत ते त्याच्या स्वभावरूप आहे. ज्ञानरूपाने, चैतन्यरूप आत्मविषयक अज्ञानाच्या योगाने, मर्यादित झाल्यासारिखे होणे, हाच जीव- भाव होय. (अर्थात् ज्ञानरूप आत्मा सर्व व्यापी आहे. पण त्याच्या सर्व व्यापि स्वभावाचा अनुभव त्याच्या अनादिसिद्ध अज्ञानामुळे येत नाही व त्यामुळे चैतन्य अतःकरणाने मर्यादित झाल्यासारखे होऊन तें जीवरूप होते.) पुढे त्याच जीवभावाचा (ह्मणजे चैतन्याच्या मर्यादित स्वरूपाचा) सस्कार दृढ झाला असता क्रमाने तोच अहकार बनतो. अग्नीच्या अल्प ठिणगीचा इधनाशी (तृण-घृत-तैलादि दाह्य पदार्थाशी) सबंध झाला असता ती ठिणगी जशी क्रमाने वाढते व मोठा थोरला अग्नि बनते त्याप्रमाणेच अल्प जीवभावाचा धन अहकार होतो. पहाणान्या पुरु- षाची दृष्टि आकाशात जेथपर्यंत जाऊ शकते तेथपर्यत तिला आकाशाचा नील वर्ण दिसत नाही. पण जेथे गेल्यावर ती कुठित होऊन पुढे जाण्यास असमर्थ होते त्याच्यापुढें, वस्तुत. नीलता नसतानाही, तिला ती दिसते. त्याप्रमाणे अहताशून्य अशा आत्म्याचे ठायी जीवाची गति न झाल्यामुळे ( ह्मणजे अज्ञानाने त्यास प्रतिबध करून स्वरूपापर्यत न जाऊ दिल्यामुळे ) त्याला अहभाव दिसतो. ( अह-मी असा अनुभव येतो..), पूर्व सकल्पाच्या सस्कारामुळे उद्बुद्ध (जाग्रत् ) झालेल्या व आपल्याच ठिकाणी आरोपित केलेल्या या प्रत्यक्ष, पण आकाशातील नीलतेप्रमाण भ्रामक कल्पनेच्या योगाने जीव अहकारास धारण करितो. हा अहकारच संकल्पाच्या योगाने, वायुस्पंदाप्रमाणे देहाद्याकाराने स्फुरण पावून, आत्म्यास देशत', कालतः, व वस्तुतः परिच्छिन्न ( मर्यादित ) करितो. त्या अहकारास रुद्र असे ह्मणावे. कारण तोच या सर्व प्राण्यास पाप-