पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. सुवर्णदृष्टया खरी नव्हे, तशीच या सर्व शक्ति व त्यांचा आधार याच्या- मधील भेदकल्पनाही व्यावहारिक आहे. पारमार्थिक नव्हे. कारण रज्जु, शिप इत्यादि जें जें कांही जसें रजतादि रूपाने अनुभवास येते ते तसेच विवर्तरूपाने होते; परमार्थतः नव्हे. कारण ते सर्प, इत्यादि पदार्थ रज्जु इत्यादिकांच्या आत उत्पन्न होत नसतात व बाहेरही उत्पन्न होत नसतात. सर्वसाधारण प्रकाशरूप साक्षि चैतन्य जीवाच्या अदृष्टवशात् उद्बद्ध होऊन कचित. किंचित् भ्रातीने पहाते. पण वस्तुतः पसरलेले हे सर्व ब्रह्मच आहे. साराश शक्ति-शक्तिमान् , अवयव-अवयवी इत्यादि सर्व, मिथ्याज्ञानयुक्त पुरुषानी कल्पिले आहे. मिथ्याज्ञान या उपाधीनें युक्त असलेली चित् शास्त्रानुगुण अथवा शास्त्रप्रतिषिद्ध असें जें कांही आपले कर्तव्य म्हणून समजते, त्याविषयी अभिमान धरिते व त्याप्रमाणेच विहित अथवा निषिद्ध आचरण करून फलभोगसमयींही तेच अनुभविते. तात्पर्य आद्यसर्गसकल्पापासून पुरुषभोगापर्यंत सर्व प्रपचरूप ब्रह्मच होतें. दुसरे काही नाही ६३. सर्ग ६४-भोक्ता जोव कोणत्या क्रमाने होतो तें या सगांत सागतात श्रीवसिष्ठ-रामा, जो हा सर्वगत, प्रकाशमय, परमात्मा, शुद्ध, स्वानुभ- वानदरूप, अतादिरहित, महेश्वर त्या शुद्ध चिन्मात्ररूपी परमानंदापासून जीव उत्पन्न होतो. (नामरूपाची व्यक्ति, एतद्रूप जगाच्या उत्पत्तीपूर्वी जीवोपाधिलिगसमष्टीची उत्पत्ति होऊन जीव उत्पन्न होतो.) पुढे तो जैविच उपाधीच्या प्रधान्याने चित्त होतो व चित्तापासून जग व्यक्त होते. श्रीराम-अखड, अद्वितीय व स्वप्रकाशं ब्रह्माचे ठायीं सखड, सद्वितीय व परप्रकाश जीवाचा उद्भव कसा होतो ? श्रीवसिष्ठ-सत्य ( अविद्यारहित ) ब्रह्माचे ठायी परमार्थदृष्टया जीव- सजेचा सभव नाही. पण अविद्यायुक्त ब्रह्माचे ठायी त्याचा संभव आहे. कारण मोक्ष होईतो जीवबीज विद्यमान असल्यामुळे त्याचे उपाधिस्वभा- वाच्या योगाने होणारे जे स्पदन (चलनशक्तिरूप प्राणधारण) तोच जीव होय. त्या जीवरूप ब्रह्मस्पदनामध्येच (ह्मणजे चिदाकाशरूप परम-आदर्शा- मध्येच) अनुभवात्मक अशा या असख्य जगत्परपरा प्रतिबिबित होतात. (जगाच्या वैचित्र्याची कल्पना करणाऱ्यास अनुकूल असलेली क्रियाश- तिच ज्यामध्ये प्राधान्ये करून असते अशा चैतन्याचा प्राणभाव हाच