पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ६३. ३१५ आहे. मोठ्या यत्नाने तिच्या ठायीं जर स्थर्यसंपादन केले तर तेंच परम शुद्ध पद व तीच परा गति होय. असो; दाशरथे. पृथ्वीवरील तृण-तरु- गुल्मादि परिणाम जसे पृथ्वीतील सत्तेपासून स्फुरण पावतात त्याप्रमाणे सर्व व्यापी ब्रह्मच या नियत्यादि महा विलासानी स्फुरण पावले आहे ६२. सर्ग ६३-ब्रह्म मायाशक्तीच्या विलासाने सर्वतः सर्वरूपाने कसे स्फुरण पावतें त्यावें येथे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ--नियत्यादि विलासांच्या योगाने ब्रह्मच स्फुरण पावतें, असें वर सांगितले आहे. पण ते कशामुळे असें स्फुरण पावतें, झणून विचारशील तर सागतो. बा रामा, हे ब्रह्मतत्त्व सर्व वस्तु, सर्वकाल, सर्व देश व सर्वशक्तिरूप आहे. त्यामुळेच ते सर्वाकार आहे. सर्वज्ञ असल्या- मुळे ते सर्वांचे नियमन करण्यास समर्थ आहे. ह्मणूनच ते सर्वेश्वर होय. ते तत्त्व कोठें दूर असेल असेही तू समजू नकोस. कारण तें सर्वग ह्मणजे सर्वात असणारे, सर्व व्यापि आहे. बरे ते एकीकडे कोठे असेल किंवा तें उदासीन असेल असेंही मनात आणू नकोस. कारण तेच सर्व आहे. ते कोठे फार दूर अथवा तटस्थ नाही, असें ह्मणण्यास आण- खींही सबल कारण आहे. ते कोणतें ह्मणून विचारशील तर सांगतो. तें ब्रह्मच आत्मा आहे. तेव्हा आत्मा दूर किंवा तटस्थ कसा असणार ? पण असे जरी आहे तरी तो सर्व शक्तिमान् असल्या कारणाने कचित् ह्मणजे मतःकरणोपाधींत जीवरूपाने प्रविष्ट होऊन चिच्छकीस प्रकट करितो; कचित् (लणजे सात्त्विक बुद्धिवृत्तांत शातीस) व्यक्त करितो, कचिव (तामस उपाधीत) जडशक्तीस व्यक्त करितो, कचित् (राजस उपाधींत) राग-लोभादिकास उत्पन्न करितो; कचित् ( मिश्रगुणाच्या कार्यात) विशे- षता ज्याचे वर्णन करिता येत नाही अशा मिश्रशक्तीस प्रकट करितो व कचित् ( सुषुप्ति व प्रलय-मरण-यांत) काहींच प्रकट करीत नारी कारण तो सत्यसकल्प असल्यामुळे जेव्हा जेथें जसा सकल्प करितों तेव्हां तेथें तसाच अनुभव घेतो तसाच तो सर्वशक्तिसंपन्न असल्यानें जी जी शक्ति जशी जशी उत्पन्न होते तशी तशीच तिची स्थिति होते व अनेक शक्तींत विलक्षणता रहाते. पण सागरांतील लाटा, लहान तरंग व जल यांची भेदकल्पना जशी मिथ्या, अथवा सुवर्णाचे कडे, कुंडल, मुकुट इत्यादिकाची भेदकल्पना जी व्यावहारिक, अलष्टया भयान