पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४२ बृहद्योगवासेष्ठसार. करिते व ती अतर्मुख असूनचे विष्णूच्या एका निमेषाच्या कोव्यंश कालांत सहस्रावधि युगरूप आपल्या आयुष्याचा अनुभव घेते ६१. सर्ग ६२-हें विश्व श्रोतिमात्र उत्पन्न झाले आहे, असे अगोदर सागून नतर जीव- मुक्ति-सिद्धयर्थ महानियतिशतीचे वर्णन येथे करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, परमाणूच्या अति अति सूक्ष्म भागांत सहस्रावधि ब्रह्मा व निमेषाच्या अति अति सूक्ष्म भागात सहस्रावधि युगें, या प्रत्यक्ष दिसणाऱ्या ब्रह्माडाप्रमाणेच, सत्य भासतात. पण अनत जीव-परमाणूतील प्रत्येकामध्ये अशा प्रकारची कल्पना सभवते. यास्तव तिचा स्वभाव अव- स्थित नाही. तर तो व्यभिचारी आहे, असे होते; व त्यामुळेच ती भ्राति होय. जलाच्या द्रवत्वाप्रमाणे या भूत-भविष्य-वर्तमान-सर्गपरपरा प्रातीतिक सत्तेच्या आधाराने कमानें वहात आहेत. पण त्या सर्व, जलातील पुष्पित वृक्षाच्या प्रतिबिबाप्रमाणे, स्वप्नातील विषयाप्रमाणे, मनोराज्यातील मगरा- प्रमाणे किवा गारुड्याने केलेल्या रुपयाप्रमाणे असत्य आहेत. श्रीराम-अहो ब्रह्मनिष्ठ, तत्त्वज्ञानाचा उदय होऊन सर्व भ्रातींचा नाश झाला असता त्या विद्वानाच्या देहाची स्थिति कशी होणार ? कारण ब्रह्म व आत्मा याचे ऐक्य आहे, असे साक्षात् अनुभवास आल्यावर दैवाच्या अधीन असलेल्या बलि-प्रभृति पुरुषाप्रमाणे, त्यानेही दैव- परतत्र रहार्ण सभवत नाही तत्त्वज्ञ, प्राणिमात्राचा आत्मा होत असतो. त्यामुळे देवही त्याची काही हानि करू शकत नाहीत, असे श्रुतीतही हटले आहे. श्रीवसिष्ठ--रामा, प्राण्यान्या अदृष्ट शक्तीचे जिला सहाय आहे अशा ईश्वरसकल्परूप महा नियतीच्या योगानेच सर्व व्यवहाराची व्यवस्था जशी होते त्याप्रमाणे विद्वानाच्या शरीराचेही धारण त्या नियतीच्या योगानें होऊ शकते. त्या ब्रह्मदेवाच्या नियतीला महा सत्ता, महा चिति, महाशक्ति, महादृष्टि, महा क्रिया, महोद्भव, महास्पंद इत्यादि ह्मणतात. प्रत्येक पदा- थांच्या स्वभावाचा नियम करणारी ती स्पदरूपी असून आदि सगोत ह्मणजे सृष्टीच्या अगदी प्रारभी उत्पन्न झाली. तिच्या विरुद्ध या जगातील एकही कार्य होत नाही. ती तृणाप्रमाणे जगाची उलटापालट करीत असते. दैत्य, देव, हत्ती, पर्वत इत्यादिकानी अशा अशा प्रकारे अमुक वेळी, अमुक स्थळी व्हावे; अमुक कार्यभारावी; इत्यादि कल्पातापर्यंतचे सर्व