पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ६१. ३४१ तजोरूप आहे, असे पाहिल्यास ती सत्य असते. मातीची बाहुली माती- हुन भिन्न आहे, असे समजल्यास ती असत् आहे. लाकडावर कोरलेलें चित्र लाकडाहून निराळे आहे, असे समजल्यास तें असत्य असते. पण काष्ठरूप आहे, असें जाणल्यास तें सत्य असते. त्याप्रमाणेच जग ब्रह्मरूप आहे, असे समजल्यास तें सत्य होते. ब्रह्माहून निराळे आहे, असे समजल्यास तें असत्य ठरतें. चिन्मय ब्रह्मच अविद्येमुळे जगद्रूप भासते. ज्ञानाच्या योगानें, (विवेकाने) जग ब्रह्मरूप आहे, असे जाणले ह्मणजे बीजांतील वृक्षा- प्रमाणे ते भिन्न दिसत नाही. साराश हे जग कारणावाचून उत्पन्न झाले आहे व त्यामुळेच तें वस्तुतः उत्पन्नच झाले नाही. पण वासनासमूहरूप मनाच्या योगाने अनुत्पन्न अशाही त्याचा उदय होतो. यास्तव त्या असत्-जगाचा उदयच होऊ नये, असे वाटत अस- ल्यास मनोनाश सपादन केला पाहिजे. पण तो ज्ञानयोगाच्या दृढ अभ्यासावाचून सपादन करिता येत नाही, व ज्ञानयोगाभ्यास हाच पुरुष- प्रयत्न आहे. करिता त्याचा आश्रय करून मनोनाशाच्या द्वारा जगाचा उदयच होणार नाही. तर आत्मतत्त्व ब्रह्मरूप होऊन राहील, असे प्रत्येक मानवाने करावे. असो; आता ज्ञानयोग कशाप्रकारचा असतो तें सागतो. काहीही केव्हाही व कोठेही उत्पन्न होत नाही व नाश पावत नाही, तर सर्व शांत, अज व चिद्रूप ब्रह्म आहे. पण चित्त असेपर्यंत परमाणूच्या उदरांतही सर्गपरपरा दुर्वार आहे. तथापि ती सत्य नव्हे. कारण चित्पर- माणूच्या आंत अवाढव्य सर्गाची परपरा कशी रहाणार ! यास्तव जला- मध्ये तरगादि जसे गुप्त रीतीने रहातात त्याप्रमाणे जीवतत्त्वात जाग्रत, स्वम, सुषुप्ति इत्यादि अवस्था व त्याचे विषय अनिर्वचनीय मायाशक्तिरू- पाने रहातात, असा सतत विचार करणे हाच ज्ञानयोग होय. पण वैराग्या- वांचून त्याचा उद्भव होत नाही. वैराग्य जसजसे वाढू लागते तसतसा दुःखक्षय होउन शाति वाढू लागते व ज्ञानवैराग्याच्या दृढतेमुळे ' देह हाच मी,' असा भ्रम होईनासा झाला की, जन्ममरणभ्रमही आपोआप क्षीण होतो. तात्पर्य चैतन्य एक, अखड व निरुपाधिक आहे, असे गुरु, शान व स्वानुभव याच्या योगानें जे जाणतात ते या संसारास जिंकितात. ब्रह्मदेवाची अहंमयी भावना-चित् निरनिरच्या संकल्पामुळे या विश्वाचा विस्तार