पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० बृहद्योगवासिष्ठसार. दोघांच्याही काल्पनिक सत्तेस अवयवरहित ब्रह्मसत्तेचाच भाधार आहे आणि त्याच न्यायाने सर्गामध्ये पर रहात नाही व परतत्त्वामध्ये सर्ग रहात नाही. तर त्यांचा आधार-आधेयभाव काल्पनिक आहे. चैतन्य जरी निष्क्रिय आहे तरी अविद्येमध्ये प्रतिबिंबित झालेल्या स्वसवित्तीच्या (स.ज्ञानशक्तीच्या) योगानें तें स्वचिन्मात्ररूप प्रपचरहस्य पहाते. ह्मणजे तोंडापुढें आरसा धरिला असतां, दृष्टि भारशावर कुठित होऊन, व परत फिरून जसें मुखच पहाते त्या- प्रमाणे अविद्यारूपी आरशावर कुठित झालेले चैतन्य परत फिरून आपणास जगद्रपाने पहाते. त्याबरोबर कारणांत लीन झालेले शब्दतन्मात्र आकाश- रूपाने व्यक्त होते. ह्मणजे ते अविद्यावृत ब्रह्मच आकाशरूप भासते. नतर त्या आकाशभूत ब्रह्मामध्ये स्पर्शतन्मात्राचा अनुभव येतो व याच क्रमानें पूर्वोक्तरीत्या सर्व जगाचा आरोप होतो. पण आपण जेव्हा जेव्हा नेत्र उघडून बाहेर पहातो तेव्हा तेव्हा एकदम (सणजे तुझी सागता तशा क्रमावाचून ) आमास जग दिसते-असें झणशील तर सागतों-बाबारे, अति सूक्ष्म कालात ज्याची प्रतीति येते तो चैतन्याचा जगदाकार परिणा- मच अनत कालपर्यत रहाणाऱ्या सर्गसमूहाची परपरा बनतो व असे होणे हाच तर चिच्चमत्कार आहे. चैतन्यात्म्याची शक्ति अघटितघटना कर- णारी असल्यामुळे चैतन्याचा अविधेशी जेव्हा जेव्हा सयोग होतो तेव्हा तेव्हा एका क्षणातही त्यास अनेक युगातील अनुभव ती करून देते. तात्पर्य कालाची गणना मायिक आहे; खरी नव्हे. कारण अशुद्ध, जड, परतंत्र, देशतः व कालतः परिछिन्न (मर्यादित) इत्यादि जे असते त्याच्या कालांचे परिमाण सागता येते. पण ब्रह्म शुद्ध, स्वयंप्रकाश, उत्पत्त्यादिकाचा आधार, ज्ञानरूप, उत्पत्तिविनाशरहित, सर्वत्र सम, व परमार्थतः सर्गशून्य आहे. मायिक बोद्धे जीव आपल्या कल्पनेने ज्या ज्याप्रमाणे ब्रह्मास कल्पितात तसे तसें तें मायेने भासतें. शास्त्रीय दृष्टीने पाहिले असता जगत-ही पर- मार्थ सत्य आहे, असा अनुभव येतो व बहिर्मुख चक्षुरादि पाच ज्ञानेद्रियें व मन याच्या योगाने पाहिले असता ब्रह्मही मिथ्या जग आहे, असे भासते. कारण इद्रियाचा विषय न होणे हाच ज्याचा स्वभाव आहे त्या चैतन्याने विषयाकार होऊन अनुभवास येणे हे सत्य कसे असेल ? तात्पर्य मायिक दृष्टया जग सत्य आहे. पण ब्रह्मदृष्टया तें असत्य आहे. तेजामध्ये असलेली भास्वरता तेजाहून भिन्न आहे, असे पाहिल्यास ती असत्य असते. पण