पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ६१. १३९ सिद्ध जगत् , मी इत्यादि नानात्व कसे व का आले. या प्रश्नाचे आतां उत्तर दिले पाहिजे. ब्रह्मरूप आत्मस्वरूपास न जाणणे ( झणजे आत्मा- ज्ञान ) हेच जग व अह आहे. स्फटिक मण्याच्या मध्यभागी रेघाचा लवलेशही नसतो, पण त्यात जसें अनेक रेघाचे प्रतिबिंब दिसते त्याच- प्रमाणे चिद्धन आकाशात आकाशरूप जग व अह भासते. पण लीन झालेले तरंग महाजलात जसे अवयवरूपाने रहातात अथवा अवयवी ( अवयववान् देह, वृक्ष, इत्यादि पदार्थ ) अवयवाचे ठायी जसे समवा- याने ह्मणजे नित्यसबधाने असतात, असें नैयायिक झणतात त्याप्रमाणे ब्रह्माचे ठायीं जगाची स्थिति होते, असे तू समजू नकोस, तर वस्ततः तरगरहित जलामध्ये जसे औपाधिक तरग रहातात त्याप्रमाणे वस्तुत. जगदहित ब्रह्मामध्ये औपाधिक जगत् रहाते. त्याचप्रमाणे अवयवी अवयवामध्ये रहातो हे ह्मणणेच अयुक्त आहे. कारण ते दोघे एकमेकाच्या आधाराने रहातात हा सिद्धात युक्तीने सिद्ध होत नाही. तो कसा ह्मणून विचारशील तर सागतो. प्रस्तुत सिद्धात मानणाऱ्या नैयायिकास असा प्रश्न करावा की कायरे बाबा अवयवाच्या ठायीं रहाणारा अवयवी प्रत्येक अवयवात सपूर्णपणे रहातो की, अवयवशःच रहातो ? सपूर्णपणे रहातो, असे ह्मणशील तर प्रत्येक अवयवामध्ये पूर्णपणे रहाणारे अवयवी अनेक आहेत, असे होणार व त्यामुळे गायीच्या कानामध्ये रहाणाऱ्या संपूर्ण गायीचे दूध कानातूनही निघाले पाहिजे. पण तसा अतिप्रसग होत असल्याचा अनुभव नाही. शिवाय अवयव तुटून निराळे होऊन पडले तरी अवयवीचा नाश होणार नाही. कारण प्रत्येक अवयवात अवयवी पूर्णपणे असतो, असे तुह्मीच ह्मणता. बरें अवयवशः तो अवय- वात असतो ह्मणून ह्मणाल तर आझी असे विचारतों की, अवयवाच्या ठायीं अवयवशः रहाणारा अवयवी त्या अवयवाच्या काही भागात रहातो की, सर्व अवयवात रहातो? काही भागात रहातो ह्मणून ह्मणाल तर त्याच्या एका भागात रहाणारा दुसरा अवयव; त्याच्या एक देशांत रहाणारा तिमरा इत्यादि प्रकारे अनवस्था येते. यास्तव अवयवाच्या सर्व प्रदेशात अवयवी अवयवशः रहातो ह्मणून ह्मणाल तर एका अवयवांत अक्यवीच्या दुसऱ्या अवयवाचा समावेश होणे शक्य नसल्याकारणाने वशी कल्पना करणेही व्यर्थ आहे. तस्मात् अवयव व अवयवी या