पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ६१. ३३. सर्म११-मोक्षरूप प्रयोजन सिद्ध होण्याकरिता व वैराग्य उत्पन होण्याकरिता संसार असत् आहे व असार आहे, असे अनेक युकीनी या सर्गात वर्णन करितात. श्रीराम-भगवन् "मी" असा अहंभाव करण्यास काही कारण नसतांना व जीव-परमाणमध्ये विपुल सृष्टीचा समावेश होण्यास फारसें निमित्त नसतांना "हा मी" व "हें विस्तृत जग" अशी भ्राति का होते ? पूर्वी एकदा आपण याचे कारण थोडक्यात सागितले आहे. पण ते माझ्या बुद्धीवर चागले आरूढ झाले नाही. यास्तव चांगल्या चांगल्या दृष्टांतांनी ते मला समजावून सागा. श्रीवसिष्ठ-बा सच्छिष्या, ज्याअर्थी बोद्धा ( जीव ) सर्व प्रकारच्या समस्त भ्रातींस स्वरूप चैतन्याच्या आत सर्वदा जाणतो, त्याच्या बाहेर असलेल्या कोणत्याही भ्रातीस तो कधीच जाणत नाही त्याअर्थी हे सर्व सर्वदा सर्वरूप आहे. ह्मणजे सर्व सम आहे. कारण सर्वच सर्वात्मक झाल्यावर वैषम्य रहात नाही. त्यामुळे जन्म, मरण, वृद्धि, क्षय इत्यादि विक्रियाही वस्तुतः युक्त नव्हेत. तस्मात् एक अज परमात्माच आहे व जगद्धाति कारणशून्य आहे. आता-विषयाशी तादात्म्य पावल्यामुळे घटज्ञान, पटज्ञान, पुस्तकज्ञान, इत्यादि ज्ञानामध्ये भेद उत्पन्न होतो व अनुभवही तसाच ( भेदरूपाने ) येतो. तेव्हा, चैतन्यात अनुभव येतो, एवढ्याच कारणाने सर्व सर्वात्मक (चैतन्यात्मरूप) आहे, असें कसें ह्मणतां येईल ? अणून ह्मणशील तर सामतों. घट, पट, पुस्तक इत्यादि उपाधीमुळे घटज्ञान, पटज्ञान इत्यादि जरी शब्दव्यवहार व अर्थव्यवहार होत असला तरी चैतन्यात काही भेद पडत नाही. कारण सर्व शब्दबोध व सर्व अर्थ-बोध ब्रह्मरूप आहेत व चैतन्यधातु ब्रह्माहून निराळा नाही. विषयसबद्ध झाल्या कारणाने चैतन्याचे ठायीं भेद असल्यासारखा भासतो. पण तो खरा नव्हे. कारण विवेकदृष्टीने चैतन्यास विषयापासून भिन्न केलें मजे त्यात भेद मुळीच आढळत नाही. आता-चैतन्य विषयाकार झाले आहे, असा अनुभव येतो हे खरे; पण वस्तुतः चैतन्य निरश, निराकार व सूक्ष्म असल्यामुळे तो त्याचा अनुभूत आकारही भ्रामक आहे. चैतन्याचा तो स्वाभाविक धर्म नव्हे. शिवाय जडाच्या अगदी विरुद्ध असलेल्या चतन्यात जडाचा आकार असतो, असे सिद्ध करावयाचे झाल्यास एकही अनुकूल युक्ति