पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१६ बृहद्योगवासिष्ठसार. झाला असता दुर्लभ मोक्षही मुलभ होतो. प्रयत्नाने व्यावहारिक नियमाचा भग व अव्यावहारिक मोक्षाचा उदय होणे शक्य आहे. असो, तस्मात् जीवरूपी चैतन्य-कणास सहस्रावधि सम-विषम भ्रात सर्ग जरी भासले तरी परमार्थत त्यास त्याची प्राप्ति होत नाही. कारण जी सत्य वस्तूच नसते तिची प्राप्ति अथवा अप्राप्ति होणे शक्य नाही. यास्तव रामा, कोणी कोणाला व्यापिले नाही व कोणी कोणाच्या आधा- रानें स्थित नाही. तर जे काही अनुभवास येत आहे ते सर्व अस्थूल व शात चिदाकाशच आहे, असे त समज. निद्रेवाचूनच विवेकदृष्टि- रहितास भासणारे हे स्वप्न आहे. हे सर्व सत्य आहे, असे ज्यास भ्रातीने भासत असते त्यासही अविष्टानभूत चैतन्याचा साक्षात्कार झाला असता ते सर्व असत् वाटू लागते. केवळ वाटू लागते इतकेच नव्हे तर तें असत् आहे, असा दृढ निश्चय होतो. राघवा एवढ्या या माझ्या सागण्यावरुन, शुद्ध ब्रह्म दृष्टया प्रपचास भिन्न सत्ता नाही. तर तो अवि- ष्ठानाच्या सत्तेनेच सत्तावान् आहे, हे तुला समजले असेल. आता माया शबल दृष्टीनेही त्यास स्वतत्र सत्ता कशी नाही, ते स.गतो. पाने, फुले, फळे इत्यादि अशानी युक्त असलेल्या वृक्षास 'हा एक वृक्ष' असेच ह्मण- तात. त्याप्रमाणे अनत शक्ती हे ज्याचे अश आहेत अशा प्रभूला एक ह्मणणे उचित आहे. नुस्त्या पानाना किवा फुलाना, अथवा फळाना जसे कोणी वृक्ष ह्मणत नाही, अथवा ती पर्णादिक त्याच्या वाचून स्वतत्र- पणे उत्पन्न होऊन राहू शकत नाहीत त्याप्रमाणे ईश्वराच्या प्रत्येक शक्तीला ईश्वर ह्मणणे योग्य नाही व त्या शक्ती त्याच्या वाचून स्वत- त्रपणे राहू शकणार नाहीत. जगात अनुभवास येणारा प्रत्येक आकार, प्रत्येक नाव व प्रत्येक शक्ति उक्तरीत्या जरी परमात्मरूप अमली तरी आत्म्याच्या अज्ञानाने ज्याची दृष्टि आच्छादित झाली आहे, अशा जीवास आत्मसाक्षात्कार होइतो त्यातील प्रत्येक वस्तु भिन्न भासते. पण साक्षात्कारानतर त्यास पुन तसा भ्रम होत नाही. तर नित्य, एक, सर्वसाक्षी, सदा शुद्ध, सर्व विकाररहित, आद्यतमध्यरहित अशा आत्म- तत्त्वाचाच अनुभव येतो. यास्तव हे राघवा, मी, तू हे जग इत्यादि या सर्व कल्पना व्यर्थ आहेत ६०,