पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ६०. ३३५ न होणारी असते आणि त्याच स्थिर अवस्थेत जी मोक्षापर्यत एकरूपाने रहाते तीच मोक्षास प्राप्त होते. ( ब्रह्मभावाने अत्यत स्थिर होणे हाच मोक्ष होय.) अर्थात् जीवचैतन्यात जगदाकाराचे अथवा ब्रह्माकाराचे प्रतिबिब पडण्यास तीव्र वेगामुळे प्राप्त होणारे चिद्विलासच कारण होतात. सामान्यतः पाहिल्यास दीर्घकालापासून ज्याचा अभ्यास झाला आहे अशा जगाविषयी तीवेग असणे युक्त आहे, असे दिसते व प्रायः प्राणी जगढन्मुख असतात; विषयोन्मुख असतात, ब्रह्मोन्मुख नसतात, असेच आढळते. त्यामुळे मोक्षाची आशा करणेही व्यर्थ आहे, असें मनात येते. पण स्वाभाविक वेगाहून यत्नाने उत्पन्न केलेला वेग अधिक बलवान् असतो, असे आपण नेहमी पहातों व त्यामुळे थोटासा धीर येतो. अति प्रयत्नाने ब्रह्माकार वेग सपादन केल्यास तो स्वाभाविक जगदाकार चिद्विलासाच्या वेगास जिकू शकतो. शिवाय सत्यज्ञान मिथ्याज्ञानाहून अतिशय प्रबल असते, हे आमास ठाऊक आहे. त्यामुळे महानदी सगम पावलेल्या इतर क्षुद्र नद्यास जशी आपल्या उदरात साठविते त्याप्रमाणे सत्य ब्रह्माकार ज्ञान इतर मिथ्या ज्ञानाम स्वाधीन करून सोडिते. पण सर्वच अधिकारी मारख्या योग्यतेचे नसतात. कित्येकाचा विषयवेग प्रबल असतो, कित्ये- काचा परमात्मविषयक वेग प्रबल असतो व कित्येकांचे दोन्ही वेग समबल असतात. त्यातील प्रबल वेग दुर्बलास आपल्या स्वाधीन करून घेतो, हे वर सागितलेच आहे. आता दोन्ही वेग समबल असल्यास त्यातील आपणास इष्ट असलेला वेग अधिक बलाढ्य करण्याकरिता काय करावे तें सागतो. प्रयत्न हेच त्याचे औषध आहे. त्याच्या योगाने हवें तें करिता येते. सृष्टीतील प्रत्येक वस्तु प्रयत्नसाध्य आहे. पण अशम वेगाचा सर्वथैव त्याग करून अथवा त्यास प्रतिबध करून अभ वेगच वाढविण्याची वद्धि पूर्वपण्य-परिपाकावाचून होत नाही पण ज्या कित्येक भाग्यवानास ती होते त्याचा विषयवेग कांहीं काल जरी ब्रह्मात्मवेगा- प्रमाणेच बलवान् असला तरी ते त्यास फार वेळ टिकू देत नाहीत. तर ब्रह्माकार वेग उत्कर्षाच्या पराकाष्ठेस पोचेपर्यत व तो दुसरा झणजे विषयवेग सर्व बाह्याकारांसह ब्रह्मज्ञानात मिळून जाईपर्यंत श्रवण, मनन व निदिध्याम याच्या योगाने यत्न करितात. तात्पर्य तीनवेगाचा उदय HARRHHHHHHHE