पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ बृहद्योगवासिष्ठसार. फल याचा सबंध केवल अत करणाशी असतो. पण जागरातील कम व फलें एकमेकाच्या कर्माशी व फलाशी सबद्ध असतात, हे प्रसिद्ध आहे. झणजेच जागराला व्यावहारिक सत्ता आहे व म्वप्नाला तीही नाही. पण हा त्या अवस्थाचा अवातर भेद आहे बाकी मनोमयत्व, काल्पनिकत्व, सकल्पमात्रत्व हे धर्म त्या दोन्हींच्या ठायीं एकसारखेच असल्यामुळे त्याचा वास्तविक व मुख्य भेद नाही प्रजा व मत्री हा आमचा राजा, तो अमुक कुलात उत्पन्न झाला, त्याचे हे राज्य इत्यादि आणि राजा, हा मी विदूरथ राजा, हे माझे राज्य, हे मी, ही प्रजा इत्यादि कल्पना करीत होता ती त्याची कल्पना फार दिवसाच्या असाने मुदृढ झाली होती व तिच्या अनुरोधाने त्याचा व्यवहार होत होता पण तो काल्पनिक व त्यामुळेच असत्य होय. आता तू ह्मणशील की, उदासीन सवित् आरोपित ( काल्प- निक, भ्रामक ) विषयाच्या आकाराची फाशी होते. पण त्याचे कारण शोधून काढण्यासाठी फार प्रयास करण्याची आवश्यकताच नाही. कारण चितामणि ( चितिलेले देणारा मणि ) जरी उदासीन असला तरी त्याचे चोहोकडे पसरणारे तेज स्वाभाविक असल्यामुळे "ते का पसरते" असा ज्याप्रमाणे प्रश्न करिता येत नाही त्याप्रमाणेच विषयाकार होणे हा सवित्- स्वभाव असल्याकारणाने त्याविषयी प्रश्न करणे अनुचित होय. चितामणी- जवळ प्रार्थना करणारे लोक आपल्या भिन्न भिन्न मनोरथाप्रमाणे निरनि- राज्या वस्तूविषयी प्रार्थना करितात व प्रार्थनेप्रमाणे तो प्रत्येकास भिन्न भिन्न विपय देतो. पण त्यामुळे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा दोष न येता विचित्र फल प्राप्त होण्यास जसा चितकाचा मनोरथच कारण होतो त्याप्रमाणे विषयवैचित्र्याचेही खरे कारण सवित् नसून विषयच आहेत. जीवाच्या विचित्र सकल्पाप्रमाणे विचित्र फल. हा चिन्मणिही मनोरथा- प्रमाणे विषयास प्रसवतो. ज्या सर्गात जेव्हा जेव्हा जे व जितके जतु असतात ते सर्व, चिद्धातु सर्वगत असल्यामुळे परस्पराचे आदर्श (आरसे, प्रतिबिब पडण्यास योग्य असे स्थान ) होतात व व्यवहार करू लागतात. श्रीराम-पण सद्गरो, बिब असेपर्यंत प्रतिबिब अवश्य पडणारच, असा जर नियम आहे तर निर्विषयताम्प मोक्ष कसा मिळणार ? श्रीवासिष्ठ-बाबारे, अनेक जीवसवित्-पैकी जी जीवसवित् (ह्मणजे ब्रह्माकारंवृत्ति ) तीनवेगवाली व त्यामुळेच विषयरूपी दोषानी कपायमान