पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ६०. ३३३ ह्मणूनच त्यास चिन्मात्रस्वभावता असते ( म. केवल चैतन्यरूपत्व हा त्याचा स्वभाव असतो.) ब्रह्म कारण व जगत् कार्य हा जो भेद आहे तो उत्पत्तीनंतर, कार्य भिन्न झाल्यावर, त्याच्या अपेक्षेने होणारा आहे. त्यामुळे तो सत्य (त्रैकालिक ) नव्हे. तर केवल मध्य-अवस्थेत ( म. वर्तमानकाली, कार्याच्या उत्पत्तीपासून नाशापर्यत ) अनुभवास येणारा आहे. एक हिरण्यगर्भ आपला अधिकार सपवून ब्रह्ममय झाला असता, पुढच्या सर्गाच्या आरभी, पूर्व सगोत हिरण्यगर्भच मी आहे, अशी ज्याने उपासना केलेली असून ती परिपूर्ण झालेली असते त्यास त्या उपासनेच्या सस्कारामळे मी हिरण्यगर्भ आहे, अशी स्मृति होते. स्मृति वृत्तिरूप असते. वृत्ति अतःकरणावाचून उत्पन्न होत नाही व अतःकरण हा आत्मा नव्हे, तर अनात्मा आहे. अर्थात् चतन्याच्या सामर्थ्याने अतःकरणात उद्भवणारी ती स्मति कल्पित होय. तेव्हा अशा कल्पित हिरण्यगर्भाच्या सकल्पामुळे निर्माण होणारे हे जग अविष्ठानाच्या सत्तेने सत्तायुक्त झाले आहे त्याला स्वतःची सत्ता नाही. श्रीराम-पण गुरुराज, भिन्न भिन्न ब्रह्माडात असलेल्या प्राण्याच्या वासनादिकाप्रमाणेच एका नगरात असलेल्या प्राण्याच्याही वासना, कमें इत्यादि विचित्र (परस्पर असदृश, भिन्न भिन्न ) असली पाहिजेत व ती तशी असल्यास स्वप्नाप्रमाणे जागगतही क्रमवैचित्र्य असावयास पाहिजे. पण ते अनुभवास येत नाही कारण तसे असते तर नगरातील लोक व मुख्य मत्री यास विदृरयाचा कुलक्रम एकसारखाच कसा प्रतीत झाला असता ? त्यातील प्रत्येकाची वासना व कामे भिन्न भिन्न असल्या- कारणाने स्वप्नाप्रमाणे प्रत्येकाला अगदी निरनिराळा अनुभव येणेंच उचित होते. श्रीवामिष्ठ-स्रष्टयाच्या सकल्पाप्रमाणे सर्व काही होते. इतर जी- वाच्या सविदानी मुख्य जीवान्या सविदेन्या अनुरोधानें रहावे, असा त्याने सकल्प केलेला असल्यास तीच नियति होते व त्याप्रमाणे जीवाचा परस्पर व्यवहार होत रहातो लहान वा-याची झुळुक जशी मोठ्या वाऱ्याच्या अतर्गत असून त्याच्या अनुरोधाने रहाते तसाच हा प्रकार आहे. प्रा- ण्याची विचित्र कही कम्कालाप्रमाणेच फलसमयीही दुसऱ्याच्या कोशी व फलांशों मिश्रित झालेली असतात. स्वमातील कमें व