पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३२ बृहद्योगवासिष्टसार. प्रतीतीच्या अधीन पदार्थाची सत्ता, पदार्थमत्तेच्या अवीन प्रतीति नाही. प्रतीतिच्या योगानेच भासणाऱ्या पदार्थाच्या हाराही, मागे म्हटल्याप्रमाणे अर्थक्रिया होऊ शकते. अर्थात् पाणी प्याले असता तहान भागणे, चालून गेले असता उद्दिष्टस्थळी पोचणे टन्यादि व्यवहार, स्वप्नातील व्यवहाराप्रमाणे, मिथ्या प्रपचाच्या द्वारा होऊ शकतात यास्तव नर्व दृश्य असत् आहे, असे तू जाण. तो मायेचा विलास आहे हे तू विसरू नको. सर्व जग समष्टि-व्यष्टि मनाचे कार्य आहे. त्यामुळेच ते मनोमय व मिथ्या आहे. बाळकास किवा भितया व खुळ्या माणसाम अधकारामध्ये भूत दिसते, त्याच्या कल्पनेप्रमाणेच त्यास त्याचा आकारही भासतो, व आपल्या कल्पनेनेच तो शेवटी भूतबावा होऊन मग्नो जगाचीही अगदी तशीच अवस्था आहे. जगातील पदार्थ निरनिराळ्या आकाराचे दिसतात, हे ग्वरे पण तो आकार मध्य-अवस्थेतच भामणारा असून आदि व अंत या अवस्थामध्ये मुळीच अनुभवास येणारा नसल्यामळे असत् आहे. ब्रह्मदेवान्या सकल्पाप्रमाणे इष्ट अथवा अनिष्ट जाणतो. सन्या पूर्वी, सोन्यातील द्रवाप्रमाणे, जग त्या परमात्म्यामध्ये नने अथवा वसत ऋतु लागताच व्यक्त होणारी झाडाची शोभा शिराचा पती जशी झाडा- मन्ये अव्यक्त असते, व वृक्षाच्या आवारानच ती माने त्याप्रमाणे हे जग त्या महा-तत्त्वामध्ये अव्यक्त व तद्रप व तदाधार असते जीव हा त्या परमात्म्याचा अतिसूक्ष्म कल्पित भाग आहे. अगा असख्य भागात एकेक जीवभोग्य सर्ग रहातो. पण त्या सीन त्रिकाळी त्या परमाभ्याचाच आधार आहे. कारण असा आत्मा व अंग ( अवयव, भाग) जीव यामध्ये वास्तविक भेद नाही त्याची सत्ता अभिन्न (एक) आहे. ह्मणजे अगीच्या सत्तेनेच अगे सत्तावान् आहेत स्वप्नामध्ये एक मनुष्ण दुसऱ्याशी भाडते लावेळी ज्याला ते म्वप्न दिसते त्याच्या दृष्टीने जरी ते भाडण सत्य असले तरी इतराच्या व ज्याच्याशी तो भाडत असतो त्याच्याही दृष्टीने ते जसे असत् असते त्याच प्रमाणे हे मायाकाशातील जगही, मायेच्या योगाने ज्याची दृष्टि आवृत झालेली असते त्याच्या दृष्टीने जरी सत्य असले तरी आत्मज्ञानी पुरुषान्या शुद्ध दृष्टीने ते असत्च असते. कारण त्याच्या उत्पत्तीचा पूर्वकाल व नाशानतरचा काल यामध्ये ते केवल ब्रह्मभावानेच अवशिष्ट रहाते आणि