पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३० बृहद्योगवासिष्ठसार. असा भिन्न भिन्न प्रमाणाचा आपण सागितलात. त्याचे कारण काय ? सर्व मर्गात कालाचे एकच प्रमाण का नाही । पूर्वी आपण या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात दिले आहे पण वाळलेल्या मातीच्या ढेकळावर दहा पाच जलबिदु सोडले तरी ते जमे कोरडे ठणठणीतच रहाते त्याप्रमाणे माझे चित्त अतृप्त आहे. ह्मणून मी पुनरपि तोच प्रश्न विचारीत आहे. श्रीवसिष्ठ---रामा, विषयाची प्रतीति, विषयाची सत्ता असेल त्याप्रमाणे. येत नाही. ह्मणजे ती विषयमत्तानुमारिणी नाही तर विपयसत्ता प्रतीतीच्या अनुरोवाने रहाणारी आहे त्यामुळे प्रत्येक द्रष्ट्या-या प्रतीतीप्रमाणे विषय- सत्ता निरनिराळ्या प्रकारची भासते. सर्व काही दृष्टया जीवाच्या हातात आहे व त्याच्या कल्पनेप्रमाणे सर्व स्थिर किवा अस्थिर अनुकूल किवा प्रतिकूल होते विपही " हे अमृत आहे" अशी सतत भावना केल्यास अमृत होते. " हा माझा शत्रु नसून मित्र आहे " अशी दीर्घकाल भावना कत्याम शत्रही मित्र होतो. श्रीराम----गुरुराज, एकाद्याने न कळत विप खाल्यास त्याचा परिणाम अनिष्ट होतो की नाही ८ केवल भावनेनेच जर विषाच्या विषत्वाची व अमताच्या अमृतत्वाची मिद्धि झाली असती तर न कळत खाल्लेल्या विपाचे ठाया, खाणायची हे विष आहे अशी भावनाच नसत्यामळे, विषत्व नसते व विषत्वाच्या अभावी त्याच्या शरीरावर त्या विषभक्षणाचा अनिष्ट परिणाम घडला नसता. पण तसे होत नाही. याचे कारण काय ? श्रीवसिष्ठ-प्रिय रामा, त्याचेही कारण न्या पिणाराची भावनाच. त्याने जर हे लौकिक विष आहे, असे समजन “ते विष नसून अमृत आहे" अशी ध्यानाने दृढ भावना केली असती तर त्याला त्याच्यामुळे मरण आले नसते. पण न कळत पोटात गेलेल्या विषाविषयी त्याने तशी भावना केलेली नसल्यामुळे व लौकिक विष मारक आहे, अशीच त्याची दृढ भावना असल्यामुळे त्यास त्याच्या योगाने मरण येणे अगदी साहजिक व न्याय्यच आहे. तस्मात् एकाद्या पदार्थाविषयीं दीर्घकाल सतत अभ्या- साने एकादी भावना दृढ केली असता तीच त्याची नियति बनते. आपण जी जी कल्पना कारतों ती ती चैतन्याच्या ठायीं आरोपित अस- ल्यामुळे स्वतः चैतन्यच कल्पनारूप होते. कल्पना सदा कल्पकाच्या अधीन असते. चैतन्याच्या अधीन ती केव्हाही नसते. त्यामुळे चैत-