पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५८. ३२७ इतक्यात तुझी आला. " राघवा, त्या सुदरीचे ते भाषण ऐकून देवी थोडेसें हसून सिद्ध लीलेस ह्मणाली, "बाळे मी आता या राजाचा प्राण सोडते ह्मणजे त्याचा देह पुनः सजीव होईल." असे बोलून तिने, पूर्वी प्रतिबद्ध करून ठेविलेला, त्याचा प्राण सोडताच तो त्या राजाच्या नासिकेपाशी गेला व वेळून्या रध्रात जसा वायु शिरतो त्याप्रमाणे त्याच्या नासारध्रात शिरला. समुद्रात जशी असख्य रत्ने असतात त्याप्रमाणे त्या प्राणरूपी जीवतत्त्वात असल्य वासना गुप्त होत्या. दाशरथे, काय चमत्कार सागावा! पाणी न मिळाल्यामुळे सुकलेले लहानसे ( तुळसीचे ) झाड पाणी मिळताच जसे टवटवीत होते त्याप्रमाणे त्याचा जीव वायुरूपाने शरीरात शिरताच त्याच्या मुखावर टवटवी आली. वायूच्या योगाने वृक्षाच्या शाखा जशा हालू लागतात त्याप्रमाणे तो आपले अवयव हालवू लागला त्याच्या शरीरात रस खेळू लागले, चतन्य सचरले, व तो कुशास वळला. काही वेळाने त्याने आपले तेजस्वी डोळे उघडले, जाभई दिली, व त्या पुष्पशय्येवर उठून बसून " कोण आहरे येथे " असे गभीर ध्वनीने हटले. त्याबरोबर त्या दोघी लीला पुढे होऊन, " महाराज, काय आज्ञा आहे ? " असे ह्मणाल्या. तेव्हा आपल्यापुढे अगदी सारख्या आका- राच्या, सारख्या सुदर, सारख्या तरुण, व एकसारखेच भाषण करणा-या दोन स्त्रिया नम्र होऊन उभ्या आहेत, असे पाहून तो ह्मणाला. " तू कोण ? व ही कोण ? कोठून आली 2" तेव्हा लीला त्याम ह्मणाली, " देव, ऐका. मी आपली गला नामक पत्नी आहे. शब्द व अर्थ याचा जसा नित्य सबध असतो त्याप्रमाणे आपल्याशी नित्य-सबद्ध असलेली मी आपली सहधर्मचारिणी आहे. मी (लीलेने) ही दुसरी लाला आपल्या उपभोगाकरिता उत्पन्न केली आहे. महाराज, आपल्या उशाशी सुव- र्णाच्या आसनावर बसलेल्या या ज्ञप्ति देवीस वदन करावे. आमा उभ- यताच्या पुण्यसचयामुळे ती देवी येथे माक्षात् आली आहे. ही सर- स्वती त्रैलोक्याची जननी आहे. हिनेच आझा उभयतास दुसऱ्या ब्रह्मा- डातून येथे परत आणिलें. " कौसल्यानदना, तिचे हे भाषण ऐकून राजास परम आनद झाला. तो लागलाच आपल्या शय्येवरून उठला व गळ्यातील माळा, हार, अगावरील वस्त्र, विखुरलेले केस इत्यादिकास सावरून मोठ्या आदराने तिच्या चरणकमलीं लीन झाला व म्हणाला