पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ बृहद्योगवासिष्ठसार. अमो; लीले, आम्ही येथून निघाल्यापासून आज एकतिसाव्या दिवशी या येथे परत आलो आहों. या प्रभातसमयीही मी या दोघी दामींस निद्रावश करून सोडले आहे. तर चल आता अगोदर आपण आपल्या सत्यसकल्पाने या लीलेस दर्शन देऊ या. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, “ ही लीला आत्माल पाहा, " असा ज्ञप्ति देवीने सकल्प करिताच त्या दोघी तेथे प्रकाशनान झा या व तिच्या दृष्टी पडल्या. प्रथम चकित झालेल्या तिने त्याना ओळग्निच नाही. चद्राच्या प्रकाशासारग्वा आपल्या या अत पुरात हा प्रकाश कसला पडला आहे, ह्मणून जेव्हा ती विशेष लक्ष देऊन पाहू लागली तेव्हा तीला दोघीचे माक्षात् दर्शन झाले त्याना पहाताच ती श्रद्धाळ लीला आपत्या आसनावरून उठली व त्याच्या चरणावर तिने आपलें मस्तक नम्र केले. नतर हर्षाने जिचे वदन प्रफुल्लित झाले आहे अशी ती लीला त्यास ह्मणाली, " माझ्या कल्याणाकरिताच येथे आलेल्या तुमचा जय- जयकार असो. तुमच्या परिचारिकेप्रमाणे मी तुमच्या मार्गाचे शोधन करीत ( मार्ग झाडीत ) येथे अगोदर आले " त्यानतर ज्ञप्तीच्या इच्छे- प्रमाणे त्या तिघीही उत्तम आसनावर बसल्या व ती देवी तिला ह्मणाली. "वत्से, तू आमच्या पूर्वी यथे कशी आलीस? येताना मागोमध्य त कोठे कोटे काय काय पाहिलेस? ते पहिल्यापासून साग. यावर ती ह्मणाली, “ देवि, मी विदूरथराजाच्या गृहात, तो राजावरील भयकर प्रसग पाहून मूछित झाले व त्यानतर मला काहीएक भासले नाही. मी गाढ अधकारात बुडल्यासारखी झाले. पुढे काही वेळाने, माझी मरण- मूर्छा गेली असता, पूर्वदेहतुल्य वासनापरिकल्पित देहाने मी युक्त झाल्ये व लागलीच आकाशात उडाल्ये आणि त्या भूताकाशात प्राणवायु- रूपी रथावर आरूढ होऊन मी या घरात आले. येथे मला हे रमणीय गृह दिसले. यात हा माझा विदूरथ पति सप्रामातील व्यवसायाने श्रात होत्साता स्वस्थ निजला आहे. त्याच्या श्रमाचा परिहार व्हावा ह्मणून सेव- कानी त्याचा हा देह पुष्पानी आच्छादित करून ठेविला आहे. देवेश्वरि, मी या माझ्या प्राणनाथाला उठविलें असते, पण श्रात झालेल्या त्याला. झोप पुरी होण्यापूर्वी, जागे करणे मला बरे वाटत नाही व त्यामुळे मी त्याच्या जाप्रतीची वाट पहात व त्याच्या सुदर शरीरावर वारा घालीत बसले होते.