पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२४ बृहद्योगवासिष्ठसार. सहकारी कारणाच्या सहायावाचून उत्पन्न झाला आहे. तेव्हा, त्यातील कायें कारण-सहायानेच उद्भवतात, असे आता जरी आमच्या अनुभवास येत असले तरी तो आरभी असनुप असल्यामुळे हा जाग्रत्प्रपचही हिरण्य- गांच्या सवितहून भिन्न नाही. ) शिवाय त्यास सत्य समजल्यास दुसरा एक मोटा दोर यतो सत व चित् हे शब्द एकमेकास सोडून कवीही रहात नाहीत. त्यामुळे जे सत् तेच चित् व जे चित् तेच सत् या न्यायाने सत्य जगही चित् होणार. पण ते चिद्रूप आहे, असे झटल्यावर चित्चा विषय होणार नाही. बरे चित्चा ते विषय नाहीच, असे समजावे तर " हे जग ' उमा जो त्याचा अनुभव येतो त्याला बाध येणार ! तस्मात् सवित् नित्य व सत्य आणि तिचे स्वप्नातील व जाप्रतीतील विषय अनित्य व अमत्य अमे तू निश्चयाने जाण अरे वेड्या, स्वप्नात पाहिलेला विशाल पर्वत जागे होताच शून्य होऊन जातो, हे स्वानुभवाने ठाऊक आहे. मग त्याचप्रमाणे ज्ञानाभ्यासाच्या योगाने व ईश्वराच्या अनुग्रहाने हा स्थूल जाग्रत् प्रपचही शून्य होणे व तो असत् आहे, असे वाटणे शक्य आहे. हे तुला कसे समजत नाही । तू ह्मणशील की, असे जर आहे तर आकाशात उडाण करून शुकाचार्य सूर्यमडलास गेले, असे जवळच्या लोकानी पाहिले व दवचिप्रमतीच्या मृत शरीराचे इतरास दर्शन झाले, असे जे पुराणात वर्णन आहे त्याची काय वाट ! तर त्याचे उत्तर सागतो. स्वाभाविक अज्ञानामुळे विवेकशून्य झालेले जन, ज्याच्या भौतिक शरीराचा बाव झाला आहे, अशा तत्त्वज्ञास वस्तुतः पाहूच शकत नाहीत. पण आपल्या अज्ञानाने कल्पिलेत्या देहाचे त्यास भान होते. साराश या सर्व द्वैतदृष्टी मिल्या आहेत. कारण त्या अविवेकामुळे भासत असतात ५७. सर्ग५८-या सगान काल, समाधिस्य लीलेच्या देहाचा विनाश, लीलेचे सभाषण व राजाचे जीवन याचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, मनाच्या चाचल्यास जसा निरोध करावा त्याप्र- माणे ज्ञाप्ति देवीने आपल्या सत्यसकल्पाने विदूरथाच्या जीवास निरोध केला. इतक्यात तिला लीला ह्मणाली, “ देवि, मी समाधी लीन झाले व राजा शव होऊन पडला, तेव्हापासून या पाद्मसृष्टीतील किति काल लोटला ( ह्मणजे त्या गोष्ठीस आज किती दिवस ना? )" त्यावर देवीने उत्तर दिले, “ वत्से, तुला समाधिस्थ हो , ३ . सृष्टीतील एक