पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२२ बृहद्योगवासिष्ठसार. पण त्यामुळे ज्ञान अनर्थावह आहे, असें ह्मणतां येत नाही. कारण स्थूल शरीर ही सत्य वस्तु नव्हे. तर तो पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे क्षणभर भासणारा भ्रामक आकार आहे. श्रीराम-बरे, ते असो, पण प्रभो, पद्माच्या गृहात भाता दोन लीला आल्या आहेत. त्यातील देवीबरोबर आलेल्या व सूक्ष्म शरीराने युक्त अमलेल्या लीलेस तेथील लोक पहाणार नाहीत, हे खरे. पण ती आता ज्ञानाच्या योगान सत्यसकल्प झाली आहे. तेव्हा गिरिग्रामाप्रमाणे येथेही जर तिने, हे येथील सर्व लोक मला पाहोत, असा सकल्प केला तर ते तिला कसे पहातील ही पूर्वीचीच आमची स्वामिणी आहे, असे ह्मणून तिला ओळखतील की, वमिष्ठ ब्राह्मणाच्या ज्येष्ठशाप्रमाणे ही कोणी अद्भुत देवी आहे, असे समजून आश्चर्यचकित होतील ? श्रीवसिष्ठ-ते पहिल्या लीलेला ही आमची राणी येथे दुःखी-कष्टी होऊन बमली आहे, असे समजून ही कोणी तिची सखी कोठून तरी आली आहे, असे जाणतील. कारण ते अविवेकी लोक पशुतुल्य असतात. तेव्हा ही दुसरी नवीनच दिसत आहे ही कोण, कोठून आली. ही चागली आहे की दुराचारिणी आहे इत्यादि संदेह त्यास कसे येणार ? पूर्वी पाहिलेल्या पदाथांच्या अनुरोधाने ते अधासारखे व्यवहार करीत असतात. त्यांना विचार करिता येत नाही. कारण ते स्थूलबद्धि अस- तात. त्यामुळे मातीचे कोरडे ढेकूळ वृक्षावर फेकले असता ते जसे बाणाप्रमाणे त्यात प्रवेश करू शकत नाही, चिखलाच्या गोळ्याप्रमाणे त्यास चिकटून राहू शकत नाही अथवा दगडाप्रमाणे त्यस क्षतही करू शकत नाही तर आपण फुट्न छिन्नभिन्न होऊन जाते त्याप्रमाणे आत्मज्ञानरहित असल्यामुळे पशूप्रमाणे असलेले ते जन विचार कर- ण्यास असमर्थ असतात आणि त्यामुळे ते तत्त्वामध्ये प्रवेश करून किवा तदेकरूप होऊन अथवा थोडासा तरी त्याच्याशी ससर्ग पावून त्याचे यथार्थ ज्ञान करून घेऊ शकत नाहीत. उलट त्या तत्त्वाकडे त्याची प्रवृत्ति झाल्यास भयरहित अशाही त्याला भिऊन ते स्वतःच नष्ट होतात. ( अनात्म्यामध्ये आसक्त होऊन आत्म्यास विसरणे हाच त्याचा नाश होय.) केवल आत्म्याच्या अज्ञानामुळेच त्याना विचार करितां येत नाही, असें नाहीं; तर स्थूल शरीरें, काम, कर्म, वासना इत्यादि त्याचे सर्व