पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५७. ३२१ श्रीराम-प्रभो, योग्याचा आधिभौतिक देहच आतिवाहिकतेस प्राप्त होतो की, ज्ञानानतर दुसराच आतिवाहिक देह उत्पन्न होतो ? स्थूल देहच ज्ञानान्तर सूक्ष्म होतो, असे म्हटल्यास मिथ्या ठरलेल्या स्थूल देहाचा सूक्ष्मदेहरूपाने परिणाम होणे शक्य नाही. बरें दुसरा नवीनच आतिवा- हिक देह उद्भवतो म्हणून म्हटल्यास ज्ञानाने मुक्ति मिळते या श्रुतिवचनाचा बाध होता. तेव्हा या अडचणीतून कसे पार पडावयाचे, ते सागा. श्रीवमिष्ठ-उत्तम पुरुषा रामचद्रा, मी तुला याचे समाधान पुष्कळ- दा सागितले असताना अजून तुझ्या मनाचा संशय कसा जात नाही? अरे बाबा, आत्मज्ञानाने स्थूल देह मिथ्या आहे, असे समजल्यावर पूर्वीच सिद्ध असलेला सूक्ष्म देह अवशिष्ट रहातो. कारण सूक्ष्म शरीर हीच ज्याची उपाधि आहे, अशा ब्रह्माच्या ठायी स्थूल शरीराचा अध्यारोप होत असल्यामुळे, स्थूलाचा ज्ञानाने बाव झाल्यावर, सूक्ष्म रहाणे हे साहजिक आहे. अर्थात् आतिवाहिकता खरी आहे व आधिभौतिकता कल्पित आहे. वासनावशात् सूक्ष्मच स्थूल भासते व जेव्हा ती वासना क्षीण होते तेव्हा पूर्वीचे सूक्ष्म रहाते. स्वप्नात “ मी कठिण दगडावर पडलो आहे " असे मऊ गादीवर निजलेल्या पुरुषास वाटते. पण स्वप्न सोडून जाग्रतीत आले की, पूर्वीच्या मऊ गादीचाच अनुभव येतो. आता तू ह्मणशील की, योगी पुरुषाच्या स्थूल शरीराचा परिणाम होत नाही, असें जर मानिले तर त्याचा जड देह अगदी हलका होऊन आकाशादिकातून कसा जातो? तर त्याचे कारण सागतो. स्वप्नामध्ये स्वामभावाने पक्षी होऊन आपण जसे आकागात उडून जातो त्याप्रमाणे आत्मज्ञानाने हा स्थल- रूपाने भासणारा देह आकाश-गमनादि करण्यास समर्थ होतो. अर्थात् हा सर्व भावनेचा प्रभाव आहे अरे लक्ष्मणाग्रजा, स्थूल देह हाच मी आहे, अशी ज्याची वासना दीर्घ अभ्यासामुळे दृढ झालेली असते त्या अज्ञानाही मरणोत्तर स्थूल देहाचा नाश झाल्याकारणाने सूक्ष्म देहाची प्राप्ति जर अनायासाने व इच्छा नसताना होते तर वासनाशून्य ज्ञानी पुरुषास अज्ञान नाशामुळे स्थूल शरीर मी नाही; तर मी त्याहून भिन्न नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव आहे, असा अबाधित अनुभव येऊन स्थूलाचा बाध झाल्यावर स्वाभाविकपणेच सूक्ष्मभावाची प्राप्ति होणे अगदी अशक्य नाही. आत्मज्ञानाच्या योगाने प्रिय शरीराचा नाश होतो, हे खरे.