पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० वृहद्योगवासिष्ठसार. तेव्हा. पण त्यातील पहिल्या प्रकारच्या मरणात पूर्व देहातील काही रहात नाही. कारण स्वप्नातील आतिवाहिक देहामध्ये, एक मृगादि भाव सोडून दुसऱ्या मनुष्यादि भावाची कल्पना केली असता त्यात जसा पूर्व मृगादि शरीराचा अल्प भागही येत नाही व ती दुसरी मनुष्यादि कल्पनाही अनित्य असते त्याप्रमाणेच योग्याने प्रारब्ध भोगांकरिता एक शरीर सोडून दुसरे घेतले असता पूर्व शरीराचा थोडासाही भाग त्या दुसऱ्या शरीरात येत नाही व ती सर्व शरीरें अनित्य असतात. दुसऱ्या प्रकारच्या मरणातही स्थूल शरीगची अनुवृत्ति होत नाही. यास्तव व योग्याचा देह जरी दिसत असला तरी तो शरदृतूतील मेघाप्रमाणे अगदी थोडा वेळ दिसतो शिवाय योग्याचा दह अवश्य दुसऱ्यास दिसतोच असा काही नियम नाही. कारण काही योग्याची इच्छा तो तात्काल क्षीण व्हावा अशी असल्यास त्याच्या सकल्पाप्रमाणे घडते. तात्पर्य योग्याचा देह योग्यास दिसणेही जर फारसे शक्य नाही तर सामान्य स्थूल दृष्टीच्या लोकास तो दिसेल ही आशा करणे व्यर्थ आहे. आता जीवतसमयी काही योग्याची शरीरे लोकास दिसतात. हे खरे, पण " हे लोक अशाप्रकारच्या मला पाहू देत" अशा योग्याच्या सत्य-सकल्पामुळेच ती दिसत असतात. ती आधिभौतिक असतात ह्मणून दिसतात, असे तू समजू नकोस. किंवा तुझ्या प्रश्नाचे समाधान दुसऱ्या गतीनेही करिता येण्यासारखे आहे. ते असें-योग्यास त्याच्या दृष्टीने आपला देह आतिवाहिक आहे, असाच अनुभव येत असतो. पण त्याच्या स्थूल शरीराच्या सबधाने ज्याना ज्याना आपल्या कर्माचा उपभोग यावयाचा असतो त्या त्या अज्ञाच्या दृष्टीने तें स्थूल आहे; ते मेले आहे, ते आता व्याविग्रस्त आहे इत्यादि कल्पना संभवते. (त्यामुळेच पूर्वी विदेह मुक्त झालेल्या शुकाचे दर्शन परिक्षित् राजाच्या सभेतील लोकाम, त्याच्या वासनाम्प, झाले व त्याने त्यास भागव- ताचा उपदेश केला ) योगी परुपास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हाच त्यांचे देहादिक बाधित होऊन जातात. त्यामळे जीवतपणीही त्याच्या दृष्टीने देहादि सत्यरूपाने असत नाहीत तर ते भ्रातिमात्र आहेत, असा त्याचा निश्चय झालेला असतो. ते म्हणतात की, देह कोण ? सत्ता कोणाची? व नाश कोणाचा आणि कसा होणार ? परमार्थत पूर्वी जे होते तेच आता(ज्ञानकाली)ही आहे. अज्ञान मात्र गेल आहे.