पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५७. ३१९ श्रीवासष्ठ-( आतिवाहिकता-बुद्धीचा उदय झाल्याकारणाने व तत्त्वबोधाने तिच्या शरीराचा बाव झाला होता. त्यामुळेच तिला स्वदेह दिसला, असे येथे सागितले नाही. आता ज्या अज्ञाच्या दृष्टीने त्याचा बाध झाला नव्हता त्याच्या दृष्टीने त्याचे काय झाले ते पुढच्या सर्गात समजेल. अशा अभिप्रायाने वसिष्ठ उत्तर देतात-) रामा, लीलेचे शरीर होतें कोठे? त्याला अस्तित्व कोट्टन असणार ? मृगजळाप्रमाणे ती केवळ भ्रातीच होय. हे सर्व जग आत्माच आहे. त्यात सत्य देहादिकाचा उद्भव कोठून होणार ? ब्रह्मच आनदरूप आत्मा असून जे दिसते ते सर्व चित आहे. लीला ज्या क्रमाने बोधमय झाली त्याच क्रमाने व त्याच बोधाच्या यो- गाने तिचे शरीर बर्फाप्रमाणे वितळून परब्रह्मामध्ये मिळून गेले. (ह्मणजे शरीरविषयक ज्ञान ज्ञानमय ब्रह्मामध्ये मिळून जाऊन असत शरीर मिथ्या ठरलें.) मी अति मूक्ष्म समष्टि-मनोमात्र आहे, अशा बुद्धीने व तत्त्वदृष्टीने तिने जे दृश्य आता पाहिले त्यालाच पूर्वी भ्रातीने ही भूमि, ते झाड इत्यादि नावे दिली. अर्थात् ज्ञानाने केवळ देहाचाच नव्हे तर भूम्यादि इतर स्थूल पदार्थाचाही नाव झाला. यास्तव वस्तुत आदि भौतिक ह्मणून काही नाहीच. मुळे बाधित शरीराचा शोध लीलेन केला नाही, ते योग्यच झाले भ्रातिकटाला जसे भ्रमाने नानाप्रका- रचे भ्रामक आकार दिसतात तसे भ्रातिरहिताला ते दिस- तील का? कधीही नाही. तस्मात् अज्ञाच्या मनाच्या समष्टीने या स्थल प्रपचाची कल्पना केली आहे व ती निर्बीज असल्यामुळे मिथ्या आहे. श्रीराम-गुरुराज, योग्याच्या देहास आधिभौतिकता नसते झणजे योग्याच्या देह स्थूल नसतो, असें जर मटले तर त्याच्या जीवतपणी व तो मत होऊन पडला असता न्याचा देह जो लोकास दिसतो तो कसा ! कारण आतिवाहिक (सूक्ष्म ) देह लोकास दिसणे शक्य नाही व तो मरून स्वस्वरूपी मिळाल्यावरही त्याचे सूक्ष्म शरीर अवशिष्ट रहात नस- ल्यामुळे ते दिमण्याचा संभव नाही. श्रीवसित राघवा, योग्यास दोन प्रकारचे मरण येते. एक-प्रारब्ध भोगाकरिता न्याने आपल्या इच्छेने नाना देहाची कल्पना केली असतां व दुसरे-सर्व प्रारब्वाचा क्षय झाला असता विदेह कैवल्य प्राप्त होते