पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१८ बृहद्योगवासिष्टसार. सोडणारे, व ब्रह्मदेवाच्या उत्पत्तिस्थानाप्रमाणे म्हणजे नारायणाच्या नाभि- कमलाप्रमाणे मुशोभित होते ५६. सर्ग ५७ - दुसऱ्या लीलेचे दर्शन, लीलेच्या देहाचे मिथ्यात्व व योग्याच्या ___ शरीराच्या आतिवाहिकतंचा उदय, याचे येथे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, पूर्वोक्त सदर गृहात सूक्ष्मछिद्रातून प्रवश करिताच त्यास त्याच्याही पूर्वी स्वशरीराने आलेली दुसरी लीला दिसली. ती पद्म- शवाच्या जवळच बसली होती. तिचा वेष, आचार, देह, वासना, आकार, रूप, सौदर्य, वस्त्रे, भूषणे, इत्यादि सर्व अगदी पूर्वी प्रमाणेच होते. विदूरथाच्या गृहामध्ये पाहिलेल्या लीलेहून हिच्यामध्ये जे काहीं अधिक होते ते हेच की, ती या समयीं पद्माच्या मदिरात होती. आपल्या हातात चामर घेऊन ती साध्वी आपल्या पतीस हळु हळु वारा घालीत होती. उदय पावणारा रजनीनाथ अतरिक्षास जसा भूषित करितो त्याप्रमाणे ती त्या मदिरास भूषित करीत होती. मौन धारण केलेल्या तिने आपले मुख डाव्या तळहातावर टेकिले होते. त्यामुळे तिचे मस्तक बरेच नम्र झाले होते. भूषणाच्या किरणानी तिला, प्रफुल्लित वेलींनी युक्त असलेल्या वनस्थलीची शोभा आली होती. आपल्या नेत्रकटाक्षानी ती जणुकाय दिश दिशेत मालतीपुष्पाचाच वर्षाव करीत आहे, असा पहाणारास भास होत असे. आपल्या लावण्याने ती सुदरी आकाशात क्षीण झालेल्या चद्रास पुनः वृद्धिगत करीत होती. त्या नगरपालरूपी विष्णूस ती जणु काय लक्ष्मीच येऊन मिळाली आहे, असे वाटे. असो, साराश येणे प्रमाणे आपल्या पतीच्या मुखाकडे दृष्टि लावून तदेकचित्त झालेल्या त्या रमणीला त्या दोघींनी पाहिले. पण तिने त्याना पाहिले नाही. कारण त्या जशा पुण्य प्रभावामुळे सत्य-सकल्प झाल्या होत्या, तशी ती झाली नव्हती. श्रीराम--गुरुराज, लीला पूर्वी तेथे आपले शरीर ठेवून ध्यानाने ज्ञप्तीबरोबर गेली, असे आपण सागितलेत. तेव्हा तिने मदिरात येताच आपले शरीर शोधावयास पाहिजे होते. पण ते न करिता ती विदूरथाच्या लीलेसच अगोदर पाहू लागली. याचे कारण काय ? तिचा तो देह कोटें गेला ? त्याचे काय झाले ? ते मला सागा.