पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५६. श्रीराम- पण, सद्गुरो, देश-कालादि सहकारि कारणाच्या साह्याने धर्मादिकाची वासना उदय पावते, असे मानल्यास महाप्रलय, सर्गाचा प्रारभ इत्यादि समयी देशकालादि काही एक नसल्यामुळे वासनेचा उद्भव होणे शक्य नाही. तेव्हा वासनामय कार्य-जग तरी कसे उत्पन्न होणार ? कारण, कारण असले तरच वासनादि हे सर्व उत्पन्न होणार ।। श्रीवसिष्ठ-दाशरथे, तू अगदी बरोबर बोलत आहेस. महाप्रलय व आरभ या वेळी सत्य आत्म्यामध्ये देश-काल इत्यादि कोठून असणार व ती सहाकारी कारणे जर नाहीत तर कारणाभावी दृश्याविषयींची बुद्धि कशी उत्पन्न होणार ? तस्मात् परमार्थत दृश्यबुद्धि मिथ्या आहे. ती कधी उत्पन्न झालेली नाही व तिचे खरोखरी स्फुरणही होत नाही आणि याप्रमाणे दृश्याचाच असभव असल्यामुळे हे जे काही दिसत आहे ते आत्मरूप चैतन्यमय ब्रह्मच आहे व तेच हे अशा री- तीने पसरले आहे. सहस्रावधि उपनिषद्वचने हाच परम सिद्धात सागत आहेत. वेद व शास्त्रे याच परमरहम्याचा बोध करण्याकरिता प्रवृत्त झाली आहेत व मीही तुला हेच महत् तत्त्व पुढे शेकडो युक्ती योजून सागणार आहे. असो, आता अगोदर चाललेली कथा ऐक. वर वर्णन केल्याप्रमाणे पद्मनगराम प्राप्त झालेल्या त्या दोघीजणीस पद्माचे सुदर मदिर दिसले. त्याच्या आतील भाग फार रमणीय होता. मदार, कुद, जाई, मोगरी, इत्यादि पुरुषाचे नानाप्रकारचे उपहार त्यात होते. सर्व राजधानीतील व विशेषतः त्या मदिरातील निद्राग्रस्त लोकाचे सर्व व्यापार प्रायः बद झाले होते. त्यामुळे सर्वत्र शातता पसरली होती. पुष्पाच्या ढिगात शव जसेच्या तसेच होते, शवाच्या शिरोभागी जलपूर्ण घट ठेविला होता. त्या राजमंदिराची सर्व कपाटे बद केलेली होती. फार काय पण खिडक्याची झटपें लावून त्यासही कड्या घातल्या होत्या. ती पहाटेची वेळ होती. त्यामळे रात्रभर जळलेले दिवे त्यावेळी मद होऊ लागल्यामुळे मदिरातील वस्तु चागल्याशा दिसत नव्हत्या. स्वच्छ व शुभ्र भितीवरही काळोखी आली होती. त्यातील भिन्न भिन्न स्थळी गाढ झोप घेणान्या लोकाचे श्वासोच्छास सारख्या प्रमाणाने चालले होते. साराश तें गृह चद्र- तुल्य आह्लादकारक, आपल्या माढयाने इद्राच्या राजधानीस तुन्छ करून