पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. ङ्केशुद्ध प्रम तेच सत्य आहे. असा त निश्चय कर. माता कारणावांचूनच कार्य होते, असें ह्मणण्यास काय प्रत्यवाय आहे ह्मणून तू विचारशील, पण मष्टी- च्या आरभापासून महाप्रलयापर्यत तसे झाल्याचा कोणालाही कधी अनुभव येत नाही व तसे होणे शक्यही नाही. कारण एका नित्य ब्रह्मसत्ते- वाचून इतर सर्व कार्यसत्ता कारणसत्तेच्या अधीन असल्याचाच अनुभव येत असतो. तस्मात् शुद्ध चिन्मात्रच भ्रातीने वासनादि जगद्रूपाने भासते, हा आमचा सिद्धात अबाधित ठरला. श्रीराम-गुरुराज, माझ्या हातून काहीएक धर्म घडला नाही, अशी ज्या प्रेताची वासना असते त्याच्या आप्तानी त्यास उद्देशून पुष्कळ धर्म केला असता त्याचा काही उपयोग होतो की नाही ? प्रेताच्या वासनेच्या विरुद्ध असलेला तो धर्म निष्फळ होतो की, आप्ताच्या वासना-प्राबल्यामुळे सफल होतो ? त्यातील सुहृद्वासना सत्य आहे. कारण त्याने मृतास उद्दे- शून खरोखरीच धर्म केला आहे व प्रेताची वासना असत्य आहे. कारण तिचा विषय सत्य नाही. तेव्हा त्यातील सफल वासना कोणती व निष्फळ कोणती ? ते मला सागा. श्रीवसिष्ठ-शास्त्रोक्त देश, काल, क्रिया, द्रव्य, इत्यादिकाच्या सप- त्तीने यथाविधि अनुष्ठान केल्याकारणाने उद्भवणारी शास्त्रानुसारिणी सुहृद्वासना, शास्त्रप्रामाण्यामुळेच, प्रबल आहे. यास्तव ती ज्याच्याविषयी उत्पन्न होते ते तसेच होते. प्रेताची वासना केवल लौकिक असल्यामुळे ती दुर्बल असते. तस्मात् शास्त्रच वासनेस प्रबल करणारे आहे. विषयाचे सत्यत्व किंवा असत्यत्व काही करू शकत नाही. धर्म-दानादिकाचे विधान करणारे शास्त्र लौकिक प्रमाणाहून प्रबल आहे. त्यामुळे पुत्रादिकानी धर्म- दानादि यथाशास्त्र केल्यास नास्तिक मृताच्याही अतःकरणात तात्काल 'मी असा असा धर्मवान् आहे' अशी वासना उद्भवते, अशी कल्पना करावी लागते. भाता मृत जीवही आस्तिक व धार्मिक असला आणि त्याच्या भास्तिक, धार्मिक व उदार पुत्राने त्याचे उत्तरकार्यही श्रद्धाभक्ति-पुर.सर केलें तर त्यांचा परस्पर उपयोग होऊन कर्म अति वीर्यवान् बनते व त्याचे फलही तसेंच मिळते. राघवा, एवढ्यासाठीच मी पूर्वी पुरुषाच्या प्रयत्नाचे प्राबल्य सिद्ध करून सर्वदा शुभकायोचाच अभ्यास करावा, असें तुला मांगित..