पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५६. ३१५ त्याच्या विषयी वासना होणेही शक्य नसते. तेव्हा त्याचे शरीर कसें उद्भवतें? श्रीवसित--आप्त पिड देवोत, की न देवोत. मृताच्या अतःकरणांत असलेली वासनाच शरीरास उत्पन्न करिते. पिडदान करावे, इत्यादि शास्त्रीय विधि मृताच्या आप्ताचे कृत्य सागत असतात. पिडदानादि कृत्याचे फल वस्तुत. दान करणान्या आप्तासच मिळत असते पण मृताच्या वासनेच्या फलाशी विधीची एकवाक्यता होत असल्यामुळे क्रियेचे फल कास व मृतासही मिळते, असे शास्त्रमत आहे. चित्तच ससार आहे. यास्तव चित्ताचे शोधन करा. प्राणी चित्ताप्रमाणे होत असतो. इत्यादि श्रुतिवचने व विद्वानाचा अनुभव हेच गुह्य सागत आहे. तस्मात् सर्व चित्तमय आहे; चित्तरूप आहे व चित्ताधीन आहे, हा नियम जीवत अथवा मृत जीवामध्ये अबाधित रहातो. मी शरीर आहे, अशा भावनेने युक्त असलेल्या ज्याला आप्तानी पिड दिलेले नाहीत, असेही मृत जीव शरीर- सपन्न होतात व मी सशरीर नाही, तर मी असग आत्मा आहे, असे ज्याचे दृढ मत झालेले असते त्याच्या आप्ताने मरणोत्तर कितीही जरी पिड दिले तरी त्यामुळे त्यास सशरीरी व्हावे लागत नाही. पण शास्त्रम- ताप्रमाणे चालण्यात इतका लाभ आहे. मृताच्या पुत्रादि-अधिकारी आप्ताने शास्त्राज्ञेप्रमाणे पिडादि-दान दिले असता मृतास त्याविषयींची वासना अवश्य उत्पन्न होते व ज्यास उद्देशून ते दिलेले नसते त्यासही शरीरा- विषयींची वासना अवश्य होतेच, पण ती अमुक वेळीच होत, असा नियम नाही. तर ती जेव्हा होईल तेव्हा होईल. साराश पुत्रादिकानी दिलेले पिडदान हे वासनेस जाग्रत् करणारे आहे. कारणावाचून काही होत नसते. प्रत्येक भावनेस कारण अवश्य लागतेच वासनेप्रमाणे पदार्थ सत्य किंवा असत्य होतो. मी गरुड आहे, अशी गरुडोपासना करणा- राला सर्पाचे विष बाधत नाही. तर उलट ते त्याला अमृततुल्य मानवते. काटा लागला असताही मला सर्पदश झाला अशी दृढभावना झाल्यास प्राण्याला मरणही येते. साराश सर्व वासनेच्या व वासनारूप भावनेच्या अधीन आहे व कारणावाचून कोणतीही भावना कोणाला होत नाही, हे तू लक्षात ठेव. पण भावना सत्य नव्हे. तेव्हा तिच्या योगाने होणारे व्यावहारिक (सत्य किंवा असत्य) कार्य तरी सत्य कसे असणार ? तस्मात् भावनेच भधिष्ठान जें