पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५६. ३११ शरीरांतील प्राणवायु शरीराच्या अल्प प्रदेशांतून निघून गेला. तेव्हां घ्राणें- द्रियास वायूतील सुवास जसा दिसतो (प्रतीत होतो) त्याप्रमाणे त्या दिव्यदृष्टि दोघी स्त्रियास त्याचा जीव अतरिक्षात दिसला. पढे वासनेप्रमाणे जाणारी ती जीवसावत् तेथें आतिवाहिक प्राणाने युक्त होत्साती आकाशात दूर जाऊ लागली. तेव्हा वायूमध्ये असलेल्या गधकलेच्या मागोमाग जशा दोधी भ्रमरी जातात त्याप्रमाणे त्या दोघीजणी त्या जीवसवितच्या मागोमाग चालल्या. पुढे थोड्याच वेळाने मरणमा शात झाली असता ती सवित् स्वप्नाप्रमाणे जाग्रत् झाली. तिने यमदूत पाहिले. ते आपल्या वासनामय शरीरास नेत आहेत, असे तिला वाटले. आपल्या आप्तानी दिलेल्या पिडादिकाच्या योगाने आपले स्थूल शरीर उत्पन्न झाले, असे तिला भासले. एक वर्षभर चालल्यावर प्राप्त होणारे अर्थात् अतिदूर असलेले व प्राण्याच्या कर्मफलाम व्यक्त करणारे यमाचे नगर त्यास दिसले. तो तेथे पोचला. दूतानी त्यास यमसभेत उभे केले. तेव्हा यमराज म- णाला, याची पापकमें मुळीच नाहीत. तो सदा पुण्यवानाची कर्मच करीत होता. हा भगवती सरस्वती देवीच्या वराने वाढला आहे. याचा प्राक्तन शव झालेला देह कुसुमाकाशात आहे. त्यात याला प्रवेश करू दे. (लीला व सरस्वती यमपुरात सूक्ष्म रूपाने गेल्या व त्यानी हा सर्व सभेतील न्यायाचा प्रकार प्रत्यक्ष पाहिला अशी कल्पना करावी किंवा राजाची वाट पहात त्या यमपुरीच्या बाहेर होत्या असे समजावें.) यमाचें हैं आज्ञावचन ऐकताच दूतानी त्यास गोफणीने फेंकलेल्या पाषाणाप्रमाणे आकाशात फेकून दिले. तेव्हा त्याची ती जीवकला, लीला व देवी अशी ती तिघेजणे आकाशातून जाऊ लागली. जीवकलेस त्या दोघी रूपयुक्त स्त्रिया दिसल्या नाहीत. पण त्या तिला पहात होत्या. जीवकलेच्या मागोमाग त्या चालल्या. भुवर इत्यादि लोकातराचे उल्लघन करून जीव- कला त्या ब्रह्माडातून बाहेर पडली व दुसन्या एका ब्रह्माडात शिरून त्यातील भूलोकीं येऊन पोचली. त्या दोघी तिच्या मागोमाग होत्याच. शेवटी जीवकला पमराजाच्या राजधानीत माली व लीलेच्या अतःपुर- मडपात एका क्षणात शिरली.