पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पचिप्रकरणं-सर्ग ५५. कटाळलेला तो जीव शेवटी शरीरत्याग करितो. पुन त्यांस स्वप्नाप्रमाणे पुत्रादिकानी द्वादशाहात क्रिया केल्यावर शरीर प्राप्त होते पुन तो कर्मा- नुरूप सुखदुःखादिकाचा अनुभव घेत यमपुराम जातो तेथे चित्रगुप्ताच्या हिशोबाप्रमाणे कृतकर्माचा झाडा देतो. यमराजाच्या आज्ञेप्रमाणे पुन स्वर्गात किवा नरकात जातो. दीर्घकालाने त्यातून सुटल्यावर पुन. नाना- प्रकारच्या हीन योनीत जन्म घेतो व शेवटी मोठ्या कष्टाने पुन मनुष्य- योनीत येतो. साराश मोक्ष होईतो प्राण्यास अशा या भयकर चक्रात पडावे लागते व एका आत्मज्ञानावाचून न्याची त्यातून कधीही मुक्ति होत नाही. जनन व मरण पुन जनन, व पुन मरण याचा प्रवाह एकमारवा चालतो. प्र. लीला-देवि, महावाक्यातील 'त्व' या पदाचा अर्थ जो जीव त्यास भ्राति होण्याचा सभघ असल्यामुळे त्याच्या अ यारोपाचा हा तू सागितलेला क्रम ठीक आहे. पण 'तत्' पदार्थ जो इश्वर ( हिरण्यगभे) त्याच्या ठायीं भ्रातीचा सभवच नसल्यामुळे तो स्वत च्या स्वरूपावर जगाचा आरोप कमा करितो ? ते मला माग, माझा बोध वाढावा ह्मणून मी असे विचारीत आहे. _श्रीदेवी-मुलि, ईश्वर जीवाप्रमाणे भ्रातीने जगाचा अध्यारोप करीत नाही. तर स्वतः परमार्थधन असतानाच त्याच्या मायेने आरोपित रूपाने विवर्त होतो. अज्ञानाने आच्छादित न झालेल्या स्वचैतन्याच्या द्वारा अध्यस्त जगाचे भान होणे (त्याचा अनुभव घेणे) हा भ्रम नव्हे तर असत्य वस्तु सत्य आहे, असा प्रतिभास होणे हा भ्रम आहे. ईश्वर सर्वदा सर्वज्ञ असल्यामुळे त्यास सर्व वस्तूचे भान होते. पण तो त्यामुळे स्वरूपापासून च्युत होत नाही व त्यामुळे भासणारे हे जग सत्य आहे, असा त्यास भ्रमही होत नाही. लीले, शैल, वृक्ष, पृथ्वी, आकाश इत्यादि सर्व परमार्थधन आहे. कारण तो ईश्वर सर्वात्मक असल्या- कारणाने जेथे जसा विवर्त पावतो तेथे तो परमाकाशतुल्य शुद्धात्मा तसाच झाला आहे, असें आझास भासतें. तो ईश्वरच स्वप्नाची कल्पना करणाऱ्या पुरुषाप्रमाणे जीवसमष्टिरूप आद्य प्रजापति होऊन-उत्पन्न करावयाच्या वस्तूविषयी सकल्प करणे-या रूपाने जसा भूर्लोक, भुवर्लोक, इत्यादि आकारानें विवर्त पावतो तशाच प्रकारची स्थिति कल्पपर्यंत राहते.