पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३.८ बृहद्योगवासिष्ठसार. या अमुक दिशेत अमुक म्थळी जाऊन आपल्या कर्माचा फलभोग घेण्याची आज्ञा केली आहे. यास्तव आतां मी सत्वर स्वर्गास किवा नरकास जातो, असा त्यास भास होतो. पुढे-यमाने कर्माप्रमाणे नेमून दिलेल्या स्वर्गात किंवा नरकात मी हे उत्तम सुख अथवा असह्य नरकयातना आजपर्यंत भोगिल्या. पशु, पक्षी इत्यादिकाच्या योनीतही जन्म घेतले. आता मी मनुष्य-मसारात पुनः उत्पन्न होतो. असा सकल्प करून ते मृत पुरुष वायु, दृष्टि इत्यादिकांच्या द्वारा भूलोकीं येतात. नतर स्वकर्माप्रमाणेच त्यातील काही शालीचे, काही गव्हांचे, काहीं जोंधळ्याचे, काही बाजरीचे, कत्येक मुगाचे, काही चण्याचे इत्यादि अकुर होतात. काही कालाने त्या अकुराचीच चागली जून झाडे होऊन ते फलरूप बनतात. पण त्या वेळी त्यास आह्मी अमुक यावेळी अमुक अकुररूप अथवा अमुक फलरूप झालो आहों, असे भान होत नाही. कारण त्यावेळी ते जटरूप असतात. त्याची इद्रिये त्यावेळी सुप्ता- वस्थेत असल्यासारखी असतात. पण पुढे योग्य अधिकारी पुरुष होऊन ते जेव्हा शास्त्रादिकाचे अवलोकन करितात तेव्हा त्यास आमीही या शरीरात येण्यापूर्वी व्रीहि-यवरूप होतो, असे भान होते. असो, येणेप्रमाणे ते बीजरूप होऊन पित्याच्या शरीरात, वर सागितल्याप्रमाणे, अन्नरूपाने प्रवेश कारतात तथे पुरुषाच्या वीर्यभावास प्राप्त होऊन ते जड अवस्थेतच मातेच्या गर्भाशयात प्रवेश करितात. तेथे त्याच्या शरीरांस आरभ होतो. पूर्व कर्माप्रमाणे त्याची ती शरीरे चागली किवा वाईट बनतात. कारण सुख, दुख, सौभाग्य, दुभाग्य आरोग्य, रोगिता, सद्वृत्त, दुवृत्त इत्यादि सर्व प्राक्तन कर्मावर अवल- बून असते असो, पुढे त्यातील प्रत्येकाचे ते शरीर मोठ्या कष्टाने मातेच्या मकुचित व अमगल स्थानातून बाहेर पडल्यावर तो रमणीय आकाराच्या बाल- पणाचा अनुभव घेतो पुढे त्यास चचल व सुदर यौवन प्राप्त होते. त्या अवस्थेत तो मदनातुर होऊन अविवेकाने अनेक निपिद्ध व्यापार करितो. लीले, तारुण्याचा मद ज्यास विवेकभ्रष्ट करीत नाही, असा भाग्यवान् एकादाच. असो, पण ती अवस्था तरी स्थिर रहाते का ? नाही थोड्याच दिवसानी विषयसेवनादि अहित आचरणामुळे व कालमानाप्रमाणे जरा त्याची मुखशोभा घालविते. जरेने शरीर खिळखिळे झाले की, व्याधीना त्यात यथेच्छ सचार करण्यास मोकळीक झालीच. व्याधीच्या योगानें जन्मास