पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०६ बृंहद्योगवासिष्ठसार. पापी तर जन्मभर पापीच राहिलेले असतात. काही प्रथम पापी असले तरी पुढे पाप कमी करून थोडेसे पुण्यवान् होतात. ह्मणजे मध्यम पापी होतात व कोणी तर पहिल्यापेक्षा अधिक पापी होतात. यास्तव मी आता भगोदर अति पाप्याची गति सागते. महापातकी प्रेत एक वर्षभर विमूढ अवस्थेत राहून मरणमूछेचा अनुभव घेतो. पाषाणाच्या मध्यभागा- प्रमाणे त्याचे हृदय आतल्या आत शून्य असते. त्यानतर तो सावध होऊन वासनेमध्ये उद्भवलेले अक्षय नरकातील दुःख दीर्घ काल भोगतो. नाना प्रकारच्या क्षुद्र व दु.खदायक योनीत जन्म घेऊन एका दुःखातून दुसऱ्या दु.खात, दुसऱ्यातून तिसऱ्यात अशा क्रमाने तो असख्य दुःखाचा उपभोग घेतो व अशा रीतीने सतत क्लेश भोगून शेवटी एकदा तो त्यातून मुक्त होतो. किवा मरणमोहाच्या शेवटी एका क्षणात तो वृक्षादि भावास प्राप्त होऊन शेकडो दु खे भोगतो, असे वाटते. पुढे तो पापी आपल्या वासनेप्रमाणे नरकयातनाचा अनुभव घेतो व शेवटीं अनेक योनीमध्ये फिरता फिरता दीर्घकालाने भूलोकी उत्पन्न होतो. आता जो मध्यम पापी असतो तो मरणमूर्छनतर थोडा वेळ पाषाणासारखें जाड्य अनुभवितो व काही कालाने अथवा तात्काल सज्ञान होऊन पक्षी, पशु इत्यादि योनीतून फिरत फिरत मानव योनीत येतो. सामान्य पातकी जो असतो तो मरताक्षणीच स्वप्नाप्रमाणे किवा सकल्पाप्रमाणे स्ववासनानुरूप मनुष्यशरीर प्राप्त झाले आहे, असे पाहतो. ह्मणजे वर सागितल्याप्रमाणे त्यास तात्काल स्मृति होते. आता पूर्वोक्त सहा प्रकारातील सहाव्या प्रकारच्या उत्तम धार्मिकाची गति सागते. महा पुण्यवान् पुरुष मरण पावताच.पुण्यवासना उद्धृत झाल्यामुळे, तात्काल स्वर्गातील विद्याधराच्या नगराचा अनुभव घेतात. तेथे त्याना त्याच्या महापुण्याचे सुखमय फल मिळते. त्याचा उपभोग घेतल्यानतर अवशिष्ट राहिलेल्या पुण्यपापाप्रमाणे ते इलावृत्त, किंपुरुषवर्ष इत्यादि स्थानीं जन्म घेतात व शेवटी पुनरपि अति सपन्न व गुणशील मनुष्याच्या कुलात त्याचा उद्भव होतो. जे मध्यम पुण्यवान् असतात ते मरणमोहानतर आकाशवायुयुक्त होत्साते ओषधि व पल्लव याचे ज्यामध्ये प्राधान्य आहे अशा नदनवन, कुबेराचे चैत्ररथवन इत्यादि वनात किन्नर, यक्ष, इत्या- दिकाच्या शरीसने जातात. तेथे आपल्या पुण्यकर्मीचे रमणीय फल भो-