पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्व ५५. दूर काही अतरावर बसलें असता वाऱ्याच्या झुळुकीबरोबर सुवासिक पुष्पाचा वास येतो, हे प्रायः सर्वास ठाऊक आहे. पण तो कसा येतो! पुष्पाच्या अतिसूक्ष्म रेणूमध्ये वास असतो व वायूचा त्याच्याशी तादात्म्य- ससर्गाध्यास झाल्याकारणाने वायु आमोदमिश्र होऊन रहातो व त्यामुळे वायू. बरोबर वास येतो. त्याचप्रमाणे चैतन्य वासनामिश्र होऊन रहाते. (ह्मणजे मूळ अविद्येच्या योगानें वासना व चैतन्य याचा अनिर्वचनीय तादात्म्या- ध्यास होऊन त्याचे मिश्रण होते.) हे प्राक्तन (पूर्वीचे) देहादि दृश्य सोडून दुसरा देह इत्यादिकाच्या दर्शनामध्ये जेव्हा जीव गुततो तेव्हा तो स्वप्नाप्रमाणे स्वत च स्ववासनामय गमन, परलोक, तेथील भोग्य पदार्थ इत्यादि नाना आकाराचा होतो. त्याला त्याच प्रदेशी पूर्व जन्माप्रमाणे स्मृति होते व मरणमूर्छच्या नतर तेव्हाच त्यास अन्य शरीर दिसते. लीला-देवि, अतिअल्प मरण-प्रदेशी दुसऱ्या देहाची कल्पना होणे जरी सभवत असले तरी तेथे दूर गमन, विस्तृत परलोक इत्यादिकाची स्थिति कशी होईल ? ( त्या स्वल्पप्रदेशात त्या विस्तृताचा समावेश कसा होईल ? ) श्रीदेवी-लीले, केवल आकाश, किवा आकाश व भूतल अथवा चद्र, सूर्य, आकाश इत्यादिकासह कोट्यवधि ब्रह्माडे आत्म्यामध्ये जरी एकदाच शिरली तरी त्यात दुसऱ्या सर्व प्रपचाचा अतर्भाव होऊ शकतो. कारण आत्मा अनत आहे - मायेमध्ये अघटित घटना करण्याचे सामर्थ्य आहे. यास्तव आत्म्याच्या स्वरूपाचे पयोलोचन करून झणजे आत्म- स्वरूपाकडे दृष्टि देऊन, अल्पप्रदेशात दुसऱ्या जगाचा अतर्भाव होतो. असे वर मटले आहे. केवल त्या प्रदेशाकडे दृष्टि देऊन झटलेले नाही. आता तू ह्मणशील की, त्या अल्पप्रदेशात मार्ग, परलोक इत्यादि जर आहे तर दुसऱ्या कोणाम याचा अनुभव का यत नाहीं ? त्याचे उत्तर सागते. आकाश व भूतल आणि हे सर्व जग मृत पुरुषाच्या आत्म्यात, मेघसमूहा- प्रमाणे, पुष्ट आहे पण दुसऱ्याच्या दृष्टीने ते केवल आकाशच आहे यास्तत्र ते कोणास दिसत नाही. ( आता मृतप्राण्याचे मार्ग भिन्न भिन्न असतात, हे सागण्याकरिता प्रेताचे प्रकार सागते.-) लीले, सामान्यपापी. मध्यम पापी, स्थूल पापी, सामान्य धार्मिक, मध्यम धार्मिक व उत्तम धार्मिक असे सहा प्रकारचे प्रेत (मृत प्राणी) असतात. त्यातील काहीं केवल २०