पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०४ बृहद्योगवासिष्ठसार. व आकाशही स्वच्छ असल्यास त्यात वरील चादण्या. चद्र इत्यादि दिसतात. पण ती त्याची उत्पत्ति झाली, असे कोणी ह्मणत किवा समजत नाही. त- सेंच ते पाणी ओतून टाकिले असता भाड्यात चादण्या वगैरे दिसेनातशा होतात पण त्याचा नाश झाला, असेही कोणी शहाणा ह्मणत नाही. त्याचप्रमाणे अत करण व्यजक आहे. ते दृष्टातातील पाण्याप्रमाणे चैतन्यास व्यक्त करीत असते व त्याचा लय झाला असता, व्यजकाच्या अभावी व्यग्याचाही अभाव होतो, या न्यायाने, किंवा दृष्टातातील नक्षत्राप्रमाणे, व्यक्त होत नाही. पण त्यामुळे त्याचा नाश झाला, असें ह्मणता येत नाही. असो, हे शुद्ध व नित्य चेतन आकाश, पर्वत, अग्नि, वायु, वृक्ष, इत्यादि सर्व स्थावर व जगम पदार्थात व्यापून असते. जेथे अतःकरण असते तेथे ते व्यक्त होते. जेथे ते नसते तेथे ते व्यक्त होत नाही तसेच भत.करण जसे मालन, आतिमलिन, शुद्ध, अतिशुद्ध, स्थिर, चचल इत्यादि प्रकारचे असेल तसे ते त्यात व्यक्त होते. त्यामुळे वायूचा निरोध होऊन ( प्राण व अपान याची गति कुटित होऊन ) त्याचे स्पदन जेव्हा याबते तेव्हा, हा अमक मरण पावला, असे ह्मणतात अर्थात् मरण हा देह वर्म आहे. आत्म्याचा धर्म नव्हे. त्यानतर शरीर जड होते. येणेप्र- माणे देह शव झाले असता, शरीरातील वायु आपल्या कारणामध्ये ह्मणजे महावायूमध्ये जाऊन मिळाला असता व प्राण प्राज्ञात्म्यामध्ये लीन झोला असता अत करण-उपाधीचा नाश झाल्याका ने जीवही वासनासह पर- मात्म-तत्वामध्ये रहातो आता तृ ह्मणगील की. परमात्म्यामध्ये राहिल्या- कारणाने तो मुक्तच झाला पण तसे नाही कारण पुनर्जन्मास कारण होणारी बीजभूत वासना रहाते. त्या वासनेने मर्यादित झालेला ह्मणजे मुख्य शुद्ध चेतन्याहून निराळा राहिलेला चैतन्याचा अतिसूक्ष्म भागच जीव होय. अर्थात् वासनायुक्त चेतनाश हाच जीव असून जीव ह्मणून कोणी ब्रह्माहून भिन्न तत्त्व नाही ( त्यामुळेच त्याला स्वस्थानी असतानाच वासनावशात् परलोकगमनादि अध्यास (भ्रम ) होतो. त्याला वास्तविक गमनादि नाही. या अभिप्रायाने देवी आता पूर्वोक्त मडपाकाशन्यायाचे स्मरण देते.) यास्तव तो शवगृहातील आकाशातच असतो. दह मेल्यामुळे व्यवहारी लोक त्या प्राण्यास प्रेत ह्मणतात. आता तू विचारशील की, असग चेतनामध्ये वासना कशी रहाते, तर त्याचे उत्तर सागाये, फुलझाडापासून