पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५५. ३०३ अनेक वासनाना जशी अनेक नावे कल्पिलेली आहेत तशीच जन्म व मरण ही दोन नावें कल्पित आहेत. . एव च कोणी जन्मास येत नाही व कोणी मरत नाही. तर वासनापरपरेच्या गर्तेमध्ये (खड्यात) जीव केवळ लोळत आहे. यास्तव दृश्याचा असभव आहे व त्यामुळे त्या विषयींची ही वासनाही मिथ्या आहे. हा विचार दीर्घकाल अभ्यासाने दृढ झाला असता अतःकरणाचा क्षय होतो आणि त्याचा क्षय होणे हाच परम पुरुषार्थ आहे. __ असो, हे लीले, ससारातील मरणासारिख्या या असंख्य भयांविषयीं चागला विचार केल्यावर वैराग्यादिकाचा प्रादुर्भाव होतो. नंतर त्या साधनानी सपन्न झालेला अधिकारी जीव गुरुमुखाने श्रवणादि अंतरग साधनाचा दीर्घकाल सतत अभ्यास करितो. त्यामुळे भ्रातीने भासणारे हे जग परमार्थतः अनुत्पन्नच (म्हणजे उत्पन्न न झालेलेच ) आहे, असें तो यथार्थ तत्त्वदृष्टया पाहतो. नतर या तत्वविवेकामुळे मूल अज्ञानाचा उच्छेद होऊन त्याची द्वैतवासना अ.यत नष्ट होते आणि त्यामुळे तो धन्य पुरुष मुक्त होतो. लीले, विमुक्त आत्म्याचे स्वरूप हीच सत्य वस्तु आहे. त्यावाचून दुसरे काहीएक सत्य नाही. ५४. सर्ग-५५. या सर्गात जीवाच्या ससारगतीचे वैचित्र्य व ईश्वराची त्याच्या कर्मानुरूप आदि सर्गापासून स्थिति त्याचे वर्णन केले आहे प्रबुद्ध लीला-हे देवेशि, प्राणी कसा मरतो व पुनः कसा जन्मास येतो, ते तू सक्षेपत सागितलेस. पण तेच पुनरपि विस्तारपूर्वक साग. कारण त्याच्या श्रवणाने दृढ पैराग्य उत्पन्न होऊन त्याच्या योगाने बोधा- चीही वृद्धि होईल. श्रीदेवी-बाळे, तुझ्या व तुजसारख्या इतर भक्ताच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा माझा स्वभावच आहे यास्तव मी तुला पुनः वर सागितलेलेंच तत्त्व विस्ताराने सागर्ते. लीले वर म्हटल्याप्रमाणे नाडी-प्रवाह बद होऊन वायूची विसस्थिति झाली असता म्हणजे त्याची स्वाभाविक चलन स्थिति प्रतिबद्ध झाली असतां चेतनेस व्यक्त करणारी अत करणोपाधि विलीन होते. व तिच्या विलयामुळे चेतनाही शात होते, असे वाटते. पण वस्तुतः ती कधी उत्पन्न होत नाही व शातही होत नाही. कारण शुद्ध चैतन्य नित्य आहे. रात्री एकाचा भाड्यांत स्वच्छ पाणी घालून तं उघड्या जागी ठेविल्यास माह