पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०२ बृहद्योगवासिष्ठसार. सोइन दुसरा घेणे? मरण ह्मणजे विनाश, असे झटल्यास पुरुषाचा विनाश पुरुषच स्वत करितो की, दुसऱ्या काही निमित्ताने त्याचा विनाश होतो? तो स्वत:च आपल्या विनाशाचे निमित्त होतो, असे ह्मणणे युक्त नव्हे. कारण कोणीही आपला आपणच नाश करून घेणार नाही व त्याचे निमित्तही होणार नाही. कारण आपल्याशीच आपण विरोध करणे, हे युक्तिशून्य आहे. बरे दुसऱ्या काही निमित्ताने त्याचा विनाश होतो, ह्मणून ह्मणावे तर आकाशाप्रमाणे निरवयव असल्यामुळे असग चेतनाचा परतः विनाशही सभवत नाही. कारण असग वस्तूचा ससर्ग दुसऱ्या कोणाशीही होत नसतो. यास्तव मरण ह्मणजे दुसऱ्या देहाची प्राप्ति असेच समजले पाहिजे. पण लक्षावधि शरीरें मेली तरी चेतन जसेच्या तसेच पित असते. तेव्हा चेतनास मरण नाही, ते देहासच आहे, असे हटल्यावाचून गत्यतर नाही. शिवाय चेतन मरते, असे मानिल्यास आणग्वी एक मोठा दोष येतो तो कोणता ह्मणून ह्मणशील तर सागत्यें. प्रत्येक शरीरात असलेले चैतन्य भिन्न भिन्न आहे, असे समजण्यास काहीएक प्रमाण नाही कारण सर्व ठिकाणी जडवर्गास प्रकाशित करणे या एकच स्वरूपाने त्याचे भान होत असते व ते निराकार आहे तेव्हा एकाच प्रकारच्या निराकार वस्तूस मिन कसे ह्मणता येईल ? भिन्न भिन्न आकाराप्रमाणे भिन्न भिन्न नावावरूनही वस्तूचा भेद सिद्ध होत असतो. पण सर्व शरिरातील या प्रकाशक शक्तीस चेतन पुरुष हे एकच नाव आहे. परमात्मा, ब्रह्म, कूटस्थ, अत- यामी, प्रत्यक्, साक्षी, इत्यादि त्याचेच पर्याय शब्द आहेत. अर्थात् चेतन प्रतिशरीरात निरनिराळे आहे, असे समजणे प्रमाणसिद्ध नाही. " एकच देव सर्व भूताच्या बद्धीत गूढ आहे " असे श्रुतिही सागते. तेव्हा एकच असलेले चेतन मेल्यास त्याच्याच अधीन ज्याची सत्ता व स्फूर्ति आहे, तें समष्टि-व्यष्टिचित्तही मरणार नाही का? व तें मेल्यावर उपादान- रहित जगाचे अस्तित्वच अशक्य असल्यामुळे एका चेतनाच्या मरणाने सर्व भाव पदार्थ मेल्यासारिखे नाही का होणार ? अर्थात् चेतन मरतें असें मटल्यास एकाच्या मरणाने सर्वाचे मरण हा दोष येतो. तर मग हे प्रत्यही अनुभवास येणारे जन्म-मरणभाव ह्मणजे काय ? तें आतां सागते. जन्म-मरण झणजे केवळ वासना-वैचित्र्य आहे. व्यवहारात