पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०० बृहद्योगवासिष्टसार, व्यथा झाल्या असता शरीरातील नाड्या अन्नपानादि रस सम प्रमाणाने घेत नाहीत. कारण त्या अतिशय तापलेल्या पित्तादि रसानी भरून जातात. त्यामुळे व्यथा असह्य होते व न्या कारणाने प्राणी आपले शरीर पिळगटून टाक लागला अमता काही नाट्या अगदी सकुचित होतात व काही फाट्टन जातात त्यामुळे समान वायुही अन्न-पानादिकास सर्व शरी- रांत सम-प्रमाणाने पोचविण्यास असमर्थ होतो नतर नाडीद्वारामध्ये शिर- लेला वायु बाहेर पटत नाही व बाहेरचा वायु आत जात नाही. अशी अवस्था झाली ह्मणजे नाट्याचा सर्व व्यापार बद पडतो. त्यामुळे इद्रियाच्या क्रियाही होत नाहीत व शेवटी आतल्या आत कृतकर्माचे स्मरण होणे मात्र अवशिष्ट रहाते नाड्याचा व्यापार खुटण ह्मणजे प्राणान्या सचारास प्रतिबंध होणेच होय व प्राणनिरोवच मरणाचे निमित्त आहे. ( अर्थात् नाड्या बद होऊन प्राणाचा निरोध झाला हाणजे हा मेला, असे ह्मणतात. कारण अपानवायूने आत शिरणे व प्राणवायूने निःश्वासद्वारा बाहेर पडणे, यावर लिंगशरीगी स्थिति अवलबून असते. पण त्याची गति कुटित झाली ह्मणजे मूक्ष्म शरीराम त्याची इच्छा नसली तरी, स्थूल दहास साटावेच लागते ) पण त्याचेही कारण प्राक्तन चिसकलारूप नियतिच आहे ह्मणजे मला इतक्या कालाने मृत्यु यावा अशी जी त्याला पूर्वी सकल्पमय सवित् झाली होती तिचेच हे त्यास फळ मिळते. आता या नियतीचा काही कारणानें भग झाल्यास जगाची व्यवस्था बिघडण्याचा सभव आहे, असे कदाचित तुला वाटेल पण ते व्यर्थ आहे कारण " मी असे असे व्हावे " अशी आदिसर्गामध्ये उत्पन्न झालेली जी सवत् ती सत्य असल्याकारणाने तिच्या सस्काराने युक्त असलेली माया कोण- त्याही काली नाहीशी होत नाही (जेव्हा मक्ति होते तेव्हा कालासह तिचा क्षय होत असल्यामुळे, काल असेपर्यंत तिचा क्षय होत नाही, असा याचा भावार्थ समजावा.) अविद्यायुक्त जीवाच्या सवित्चे पर्यालोचन केले असताही मोक्षापर्यत जन्ममरणाची निवृत्ति होणे शक्य नाही, असें समजते. सवेदन हा जीवाचा नित्य स्वभाव आहे. त्यामुळे जीवस्त्रभावभूत सवित्तीहून जन्म-मरण भिन्न नाहीत. नदीचे जल जसे दूरवर पसरलेले असून कोठे कोठे तें सथ व निर्मल असते आणि कोठे कोठे क्षुब्ध (तरगमय) व मलिन असते त्याप्रमाणे हे चेतन केव्हा केव्हां सोम्य