पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५४. २९९ नेत्रादि इद्रियाचा मनामध्ये लय होऊ लागणे, हाच अत्यकाळच्या मूर्च्चा आरभ होय. मरण ही एक महानिद्राच असल्या कारणाने निद्रासमयी इद्रियवृत्ती जशा लीन होऊ लागतात तशाच त्या मरणसमयीही मनात लय पावू लागतात त्यावेळी नेत्रादि गोलक शून्य होतात. सूर्य अस्त पावू लागला असता किरण जसे चोहोकडून एकाच काळी नाहीसे होऊ लागतात त्याप्रमाणेच जीव-सूर्याचा अस्त होऊ लागला की, त्याचे शक्ति- रूपी किरणही क्षय पावतान नतर त्याची स्मृति अगदी शिथिल होते. जवळचे लोक "मला ओळखलेस का? मी कोण " इत्यादि विचारतात; पण तो कोणालाही आठवीत नाही व ते काय ह्मणतात हेही जाणत नाही पुढे पूर्णपणे मोहित झाल्यामुळे त्याच्या मनाची कल्पनाशक्ति क्षप पावते. त्या अविवेकामुळे तो महामोहात निमग्न हातो. श्वासोच्छस -रण्याचीही त्यास शक्ति रहात नाही. मोह, विषयवासना व भ्रम ( भलभलते भास ) ही तिन्ही ऐकमेकामुळे पुष्ट होऊन शेवटी प्राणी पापाणासारिखा निश्चेष्ट होतो (त्याचा जड देह, त्यातील चालक व ज्ञान-क्रियाशक्तिमान् जीव प्राणवायूच्या द्वारा निघून गेला ह्मणजे आपल्या स्वाभाविक जडतेस प्राप्त होतो. अर्थात् देहाची क्रिया आपाधिक असून त्याचा प्रवर्तक, रथ-प्रवर्तकाप्रमाणे, न्याहून निराळा आहे. ) ठीले हा क्रम आदिमर्गापासून असाच चालला आहे. प्रवुद्ध लीग-देव, हा देह मस्तक, दोन हात, दोन पाय, गुह्य, नाभि व हृदय या आठ अगानी युक्त असताना तू आता सागितल्याप्रमाणे तो व्यथा, मोह, महामोह, भ्रम व जडना याम का प्राप्त होतो? श्रीदेवी-लीले, क्रियाशक्तिप्रवान ईश्वराने “ जीवाहून भिन्न नमलेल्या मी बाल्य, यौवन, वाक्य, इत्यादि समयी इतके दिवस, अमुक दुःख, अमुक शरीराने भोगावे " असा सकल्प करून ठेविलेला असतो त्यामुळे न्यास आपल्याच सकल्पापासून उत्पन्न झालेल्या चित्ताच्या द्वारा चित्तस- कल्पमय दुःख, शरीररूपी उपाधींत जीवभावाने शिरून, भोगावे लागते. ( अर्थात् व्यथा, मोह, इत्यादि भाव देहास अनुभवावे लागत नाहीत, तर ते त्यातील मिथ्या सकल्पामुळे जीवभावास प्राप्त झालेल्या चैतन्यासच पूर्व कर्मानुरूप भोगावे लागतात. ) असो, वर सागितल्याप्रमाणे असह्य