पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९८ बृहद्योगवासिष्ठसार. लीला-जनान, हे मरणकालचे दुःख सर्वांस सारखेच होते की, काही भाग्यवानांना सुखही होते ? त्याचप्रमाणे मरणानतर सर्वाची एक- सारखीच गति होते की, योग्याची काही विशिष्ट गति आहे ? श्रीदेवी-~-वत्से, मरणारे पुरुष तीन प्रकारचे असतात. मूर्ख, धारणा- भ्यासी व युक्तिमान् असे ते तीन प्रकार होत त्यातील धारणाभ्यासी व युक्तियुक्त पुरुप अनायासाने देहत्याग करून जातो. नाभिकमल, हृदय, कंठ, भ्रमध्य, व ब्रह्मरध्र यामध्ये काही नियमित कालपर्यत मन व प्राण याचा निरोव करणारा पुरुष धारणाभ्यामी होय आणि योगाभ्यास करून स्वेच्छेने प्राणवायूस पाहिजे तेथे सचार करावयास लावण्याइतके कौशल्य ज्याने सपादन केले आहे तो युक्तिमान् किवा युक्तियुक्त. त्यातील धार- णाभ्यामी मध्यम साधक असून तो क्रमाने युक्तीचा अभ्यास करीत सुखी होतो व उत्तम युक्तियुक्त, असेल त्या स्थितीत सुख भोगतो. आता ज्याने व रणचाही अभ्यास केलेला नाही व युक्तीचेही सपादन केले नाही, तो मूर्ख होय त्याचे मन त्याच्या स्वाधीन नमते व त्यामुळे त्यास असह्य दु ग्व होते त्याची विषयवासना अतिशय दृढ असते. त्यामुळे त्याचे चित्त विषयाकडे जाते परमार्थाकडे त्याचे चित्त लागत नाही. विपयास सोडताना, तोडलल्या कमलाप्रमाणे, त्याचे मुख म्लान होते व तो दीन होतो. ही झाली सामान्य मूर्खाची गोष्ठ शास्त्र- निषिद्ध कर्म करणाराविषयी तर विचारूच नकोस. धगधगीत अग्नी- मध्ये पडलेल्या प्राण्याना जसे क्लेश होतात तसे क्लेश त्यास आतल्या आत अनुभवावे लागतात. त्यावेळी अति दुख झाल्या कारणाने कठ घुर-घर वाजू लागतो, डोळे पाढरे होतात, (म्हणजे बुबुळे वर चढून नेत्राचा वर्ण जरा भयप्रद होतो ) मुख निस्तेज होते, अधकाराचा अनुभव येतो; भलभलतेच आकार डोळ्यापुढे दिसू लागतात, मर्मन्छद होऊ लागतो; सर्व भुवन गरगर फिरत आहे, असा भ्रम होतो, नानाप्रकारचे भय वाटू लागते; वाणी बद झाल्यामुळे मनातील अभिप्राय कोणास सागता येत नाहीं; तोडे वेडी वाकडी करून, डोळे फिरवून, हातपाय ताठवून व वेगाने झाडून, फेस, लाळ इत्यादिकास तोडाबाहेर काढून व अशाच अनेक प्रका- रानी तो मरणोन्मुख मूर्ख जवळच्या आप्त-इष्टास संसार किति कष्टकर आहे हे प्रत्यक्ष दाखवीत असतो. शेवटी तो मूञ्छित होऊ लागतो