पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५४. २९७ कर्मे ( ह्मणजे मतत अभ्यास व दृढ वासना याचा योगाने प्रबल झालेली कर्मे ) आपले फल देण्यास उत्सुक होतात. यास्तव, वत्से, मी तुला मरणानतर कर्मफलाचा अनुभव कोणत्या क्रमाने येतो ते सागते. मणजे तुझे सर्व सदेह नाहीसे होईल व तुझ्या द्वारा इतर लोकानाही या गूढ नत्त्वाचे ज्ञान होइल. त्यामुळे त्याची आस्तिक बुद्धि वाढेल व सर्वाचेच कल्याण होईल पुष्कळाचे कल्याण होईल, असे कृत्य सर्वदा करीत असावे कृत, त्रेता, द्वापर व कलि या युगामध्ये क्रमाने चारशे, तीनशे, दोनशे व शनर वर्ष पुरुपाचे आयुष्य असावे अशी नियति आदि- सृष्टीत ठरली पण ही आयुर्मर्यादा दुसऱ्या काही निमित्तानी वाढावी किंवा क्षीण व्हावी अशीही एक नियति आहे. कर्मे आयुष्याचे निमित्त आहे, व ती शुद्ध देश, काल, क्रिश व द्रव्य याच्या योगाने अधिक सामर्थ्ययक्त होऊन मनुष्याच्या आयुष्यास वाढवि- तात आणि अशुद्ध देशादिकाच्या योगाने त्यास क्षीण करितात. त्याच- प्रमाणे शास्त्रविहित कर्माचे अनुष्ठान न केल्याने आयुष्य कमी होते. शास्त्राने जेवढे सागितले असेल तेवढेच केल्याने ते प्रत्येक युगाची जी आयुर्मर्यादा मागितली आहे तितकेच रहाते व शास्त्राने सागितले असेल त्याहून अधिक आस्थेने व श्रद्धेने अधिक अनुष्ठान केले असता आयुष्य युगमर्यादेहूनही अधिक वाढते. शास्त्रविहित कर्मे न करिता शास्त्रनिषिद्ध कर्मे केल्यानेही आयुष्याचा क्षय होतो. शास्त्रोक्त स्वधर्मा- चरणाने केवळ आयुष्य वाढते इतकेच नव्हे तर त्याचा इतर गोष्टींतही ऐहिक व पारलौकिक उत्कर्ष होतो. अमो, येणेप्रमाणे ज्या प्राण्याचे आयुष्य कर्मानुरोधाने समाप्त होते न्यास अत्यसमयीं मर्मच्छेदक वेदना होतात. ( मरणाऱ्या प्राण्यास किती असह्य वेदना होत असतात याचा साक्षात् अनुभव त्यास पाहणाऱ्या जवळच्या लोकास येणे शक्य नाही. तरी पण त्याच्या धडपडीवरून व इतर चिहावरून त्या अति असह्य असाव्यात, असे सहज अनुमान होते ह्मणूनच पुराणात-शरीरातील सर्व नाड्यामध्ये पसरलेली प्राणशक्ति हृदयामध्ये लीन होऊ लागली झणजे सहस्र विचू चावल्या सारिख्या वेदना होतात-असे सागितले आहे.)