पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५४. २९५ होणे तेच हे ब्रह्माड होय. त्यात असलेले हिरण्यगर्भसंज्ञक ब्रह्म, मी चतुर्मुख ब्रह्मा आहे, असे जाणते व प्राण्याच्या कर्माप्रमाणे मनोराज्य करिते तेच सत्यसकल्प मनोराज्य हे जगत् होय प्रथम त्याने जसा जसा सकल्प करून ठेविला आहे त्या त्याप्रमाणे अद्यापि सर्व चालले आहे. मन नानाप्रकारच्या विचित्र वासनामय आहे. त्यामुळे त्याचा जरी विचित्र सकल्परूपाने परिणाम होत असला तरी चैतन्याचा तदनुसारी विवर्त का व्हावा? ह्मणून ह्मणशील तर सागते. आपली स्वन्छ उपाधि जशी होईट त्याप्रमाणे स्वत होणे हा आत्मचैतन्याचा स्वभाव आहे. त्यामुळे चित्त जसे स्फुरण पावेल त्याप्रमाणे आत्मचैतन्य होते. यात अस्वभाविक किवा अनियत असे काहीच नाही शिवाय मायाशबल ब्रह्मामध्ये अनादि नियतरूपाने स्थित असलल्या विश्वाचाच आविर्भाव होत असल्या- कारणाने नियतीचीच सिद्धि होत आहे. ह्मणजे प्रलयकाळीही सर्व वस्तु- शून्यत्व सभवत नाही. कारण त्या वेळी जर या जगाचा अत्यत अमात्र झाला असता तर ही प्रस्तुत सृष्टि, बीजाचाच अभाव झाल्यामुळे, उद्भवली नसती. सोने-कडे, कुडल, मोहोर, पुतळी, गोप इत्यादि आकारातील कोणत्या तरी व्यक्त किवा अव्यक्त आकारावाचून ..स गहील ? अर्थात् सोन्याचे जेवढे ह्मणून आकार होणे शक्य आह, तितके सर्व आकार त्यात आहेतच त्यातील एकादाच जरी एकादे वेळी व्यक्त अमला तरी इतर ( आकार ) त्यात शक्तिम्पाने असतात व ते जर तसे नसते तर त्यात कधीच उद्भवले नसते मातीमध्ये तरग शक्ति- रूपाने नसतात. ह्मणून मातीपासून ते उद्भवत नाहीत असो, तस्मात् प्रलयसमयींही जगाचा अत्यत अभाव नसतो. तर ते शबल ब्रह्मामध्ये अव्यक्तरूपाने किंवा बीजरूपाने अथवा शक्तिरूपाने रहाते व सृष्टीच्या आरभी चित् जशी जल, अग्नि इत्यादि पदार्थाच्या शैय, उष्ण, इत्यादि स्वभावाने व्यक्त होते तशीच ती त्या त्या पदार्थाचा तो तो स्वभाव होऊन कल्पात होई तो रहाते. शिवाय मायाशबल ब्रह्माने जर आपली स्वरूपभूत सत्ता टाकिली असती तर मायेच्या अतर्गत असलेल्या नि- यतीस असत् ह्मणता आले असते. पण तसे होणे शक्य नाहीं तस्मात् नियतीचा अपहव ( निषेध ) करिता येत नाही. तिचे अस्तित्व माना- वेच लागते. पृथिवी, जल इत्यादि पदार्थाची सतत समान स्थिति होणे,