पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९४ बृहद्योगवासिष्ठसार. तेव्हा त्याचा निर्णय कसा करावयाचा १ असा लीलेच्या प्रश्नाचा भाव आहे ) देहादिकाच्या जीवन, सौख्य, इत्यादि भावामध्ये व दुःख, दुर्भाग्य इत्यादि अभावामध्ये पूर्वी नियति कशी आली व पुनः अनियति कशी प्राप्त झाली ? नियति कोठेच नसून सर्वत्र अनियतिच आहे, असे ह्मणावे तर जलाचे शीतलत्व, नीचे उष्णत्व इत्यादि स्वभाव कसे उद्भवले. घटादि पदार्थामध्ये सत्ता (भावरूपता-नियम ) कशी आली. सत्य रजतादि भावाचा सग्रह व असत्य शुक्तिरूप्य इत्यादि अभावाचा त्याग लोक का करि- तात ? भूमि, आप् इत्यादि स्थूल आहेत, मन, इद्रिये इत्यादि सूक्ष्म आहेत इत्यादि विचार कसे द्भवतात । तृण, गुल्म, वृक्ष पुरुष इत्यादिकामध्ये उची कोठून आली? सर्वत्र अनियमच जर आहे तर पदार्थाविषयी प्राण्याचा विश्व , वा दिसत नाही ? व जगात विश्वासाने जी सर्व कार्ये एकसारखी होत असतात त्याची वाट काय ? श्रीदेवी-लीले, मी तुला याचे उत्तर मागेच दिले आहे पण पूर्व सस्कार अति दृढ असत्यामुळे ते तू विसरटीस | तुह्मी मानव तत्त्वार्थ असाच वारवार विसरता व त्यामुळे आमास एकदा सागितलेलाच सिद्धात वारवार स.गून दृढ करावा लागतो. असो, हे जग जर केवळ सत्य- स्वभाव असते तर त्यामध्ये एकसारिखी नियतिच आढळती व ते जर केवळ असत्स्वभाव असते तर अनियतिच अनुभवास येती. पण केवल ब्रह्म किवा केवल माया ही त्याची प्रकृति नसून सत्य व अनत यानी मिश्र असलेले जे अव्यक्त ती त्याची प्रकृति आहे. त्यामुळे सत्यानृत-स्वभाव व भोक्त्याच्या अदृष्ट प्रमाणे वागणारी चित् या सृष्टीत विवर्त-रूपाने रहाते, त्यामुळे सृष्टीत काही सत्याश भासतो व काही असत्याश अनुभवास येतो. ___ असो, आता शुद्ध चैतन्याचा विवर्त कोणत्या क्रमाने होतो ते पुनः सागत्ये, महाप्रलय होऊन सर्वांचा अस्त झाला असता अत्यत शात, अनत. निरवयव व सत्स्वरूप ब्रह्म अवशिष्ट रहाते. ते चिद्रूप असल्याकारणाने. मी तेज.कण (ह्मणजे तेजानें व्याप्त झालेली सूक्ष्म भूते ) आहे, असा अनुभव घेते. स्वप्नातील अनुभवाप्रमाणेच तो त्याचा अनुभव मिथ्या असतो. पुढे केवळ मिथ्या अभिनिवेशामुळे तेजःकण-भावास प्राप्त झालेला हा आत्मा आपल्याहून भिन्न रूपाने कल्पिलेल्या जलादि आवरणा- सर्घ्य " मी स्थूल झालो आहे " असे खोटेच जाणतो. हे जे त्याचे स्थूल