पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५४. २०३ पुढे ते मिळते आता अर्थक्रिया करणारा स्थूल देह तत्त्वज्ञानाच्या योगाने बाधित कमा होतो म्हणून म्हणशील तर सागते. तत्त्वदृष्टीने पाहिल्यास अर्थक्रियाच भासत नाही भ्रामक वस्तु तात्विक अर्थक्रिया काय करणार? हा देह मेला, हा जन्मास आला इत्यादि हे सर्व पूर्व दृढ अभ्यासाचे विलास आहेत. जीवाच्या सकल्पावाचून त्यास कोणतेही फल भोगावे लागत नाही. सत्य सकल्प ईश्वर जे काही आह्मास देतो ते आमन्याच प्रपन्नाचे फल आहे. हे तू चागले ध्यानात घर. सर्व ससार वासनामय आहे. त्याचा चित्तातच अनुभव येत असतो. ज्याना तत्त्वज्ञान झालेले नसते त्यानाही, दुसऱ्या चद्राप्रमाणे, पदार्थ जरी देहान्या बाहेर भासत असले तरी ते आत असतात. बाहेर चद्र एक आहे पण ज्याच्या नेत्रास रोग झालेला असतो त्यास दोन चद्र दिसतात. त्यातील दुसरा चद्र जरी पहिल्याप्रमा- णच फार दूर दिसला तरी तो कल्पनामय असल्यामुळे आत ( मनात ) अमतो, हे उघड आहे त्याप्रमाणेच बाह्य पदार्थ आत आहेत, असे समजावे ५३. सर्ग ५४--सर्व पायच नियति, मरणकर, ट खर्भ ग अणि कर्म, गुण व आचार __ याच्या योगाने प्रप्त होणारे आयु प्रमाण याचे येथे वर्णन करितात. श्रीदेवी-लीले, जे श्रेष्ठ धर्माचा आश्रय करितात व वेद्य तत्त्वास जाणतात तेच आतिवाहिक लोकाम प्राप्त होतात. दुसरे कोणी प्राप्त होत नाहीत कारण आविभौतिक देहत्व हा मिथ्या भ्रम आहे तेव्हा सत्यामध्ये तो कसा राहील 2 प्रकाशामध्ये अवकार कधी तरी राहील काय ? असो, ही आमची लीला तत्त्वज्ञ व परम धर्म-सपन्न होती. ह्मणून ती पतीच्या कल्पित नगरास गेली. ( वस्तुत. सूक्ष्म भाव प्राप्त होणे हा सुद्धा खरा पुरुषार्थ नव्हे कारण ब्रह्माच्या अपेक्षेने तोही मिथ्या आहे. पण स्थूलाच्या अपेक्षेने त्याचे कारण सूक्ष्म सत्य असल्यामुळे व पुण्यप्रभावाने त्याची प्राप्ति झाली असता ब्रह्मलोकादि उत्तम लोकात जाण्याचे सामर्थ्य येत असल्यामुळे त्याची येथे स्तुति केली आहे ) प्रबुद्ध लोग--देवि, बरे असो, ती अशाप्रकारे गेली तर जाऊ दे. पण अबे, हा माझा भर्ता माझ्या समोर प्राणत्याग करण्यास प्रवृत्त झाला आहे. आता काय करावे ? ( ह्मणजे याच्या या मरणाची उपपत्ति कशी लावावयाची ? या सृष्टीत काही नियम दिसतो व काही अनियम आढळतो.